Friday, April 19, 2024

भावाच्या निधनावर महेश बाबूने लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला ‘तू नेहमीच माझी…’

टॉलिवूड अभिनेता-निर्माते रमेश बाबू यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले. आपल्या मोठ्या भावाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना महेश बाबूने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हा अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह असून तो आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे तो त्याच्या भावाच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकत नाही.

महेशने (Mahesh Babu) आपल्या भावाची आठवण करत ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या भावाचा जुना फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन लिहिले की, “तू माझी प्रेरणा आहेस, तूच माझी शक्ती आहेस, तूच माझे धैर्य आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. तू माझ्यासोबत नसतास, तर आज मी काहीच झालो नसतो. तू माझ्यासाठी जे काही केलेस त्याबद्दल धन्यवाद. आता जरा आराम करा…. विश्रांती घे… या जन्मात मी कोणताही जन्म घेईन, त्या सर्वांमध्ये तू माझा अण्णा होशील. तुझ्यावर सदैव आणि सदैव प्रेम राहील.”

अखेरचा निरोप घेण्यासाठी कुटुंबीय पोहोचले पद्मालय स्टुडिओत 

रमेश बाबू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी (९ जानेवारी) त्यांच्या पार्थिवावर महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अखेरच्या क्षणी निरोप देण्यासाठी कुटुंबातील सदस्य पद्मालय स्टुडिओत पोहोचले. महेश आयसोलेशनमध्ये असल्याने तो अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नाही. महेशच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावर ही माहिती दिली. कुटुंबातील इतर सदस्य सुधीर बाबू आणि नरेश स्टुडिओत पोहोचले. याशिवाय एमएएचे अध्यक्ष विष्णू मंचू यांनीही हजेरी लावली. त्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. याशिवाय चिरंजीवी, पवन कल्याण, नितीन, वरुण तेज, रकुलप्रीत सिंग यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.

रमेश बाबू यांनी १९७४ पासून करिअरला केली सुरुवात 

रमेश बाबू यांनी १९७४ मध्ये ‘अल्लुरी सीताराम राजू’ या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. १९९७ मध्ये त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये १५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर रमेश यांनी चित्रपटांची निर्मिती सुरू केली. त्यांनी महेश बाबूचे ‘अर्जुन’ आणि ‘अतिथी’ या चित्रपटांची निर्मिती केली.

महेश बाबू कोरोना संक्रमित 

महेश बाबूने ६ जानेवारी रोजी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, “माझ्या सर्व चाहते आणि हितचिंतकांनो, सर्व खबरदारी घेऊनही, मी सौम्य लक्षणांसह कोविड-१९ पॉझिटिव्ह आहे. मी स्वतःला वेगळे केले आहे आणि जो कोणी माझ्या संपर्कात आला असेल, त्याने स्वतःची चाचणी करून घ्यावी. मी सर्वांना लस घेण्याचे आवाहन करतो. कारण यामुळे गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होतो,” अशी माहिती त्याने दिली आहे. त्यासह लोकांना लस घेण्याचे आवाहन करत त्याचे महत्त्व देखील सांगितले आहे. भावाच्या जाण्याने महेश बाबूवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :

नवीन दिवस नवीन फोटो! काळ्या ब्रा आणि स्कर्टमध्ये उर्फी जावेदने लावली पुन्हा इंटरनेटवर आग

लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यानंतर विकी कौशलने कॅटरिना कैफला दिले वचन, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

घटस्फोटानंतर आपल्या तुटलेल्या नात्यावर काय म्हणाले आमिर अली आणि संजीदा शेख

 

हे देखील वाचा