Thursday, April 18, 2024

‘गुलशन कुमारांच्या हत्येप्रकरणी मला पोलिसांनी ताब्यात घेतल आणि…’, मानव कौलचा धक्कादायक खुलासा

गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. अंधेरी पश्चिम इथल्या जीत नगर परिसरातील एका शिव मंदिराबाहेर हा सर्व प्रकार घडला होता. त्यावेळी त्यांच्यावर 16 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी बाॅलिवूडचा लोकप्रिय अभिनेता मानव कौलला  पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या प्रकरणी मानव कौलने धक्कादायक खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलताना मानव कौल (Manav Kaul) म्हणाला की, “जेव्हा माझ्या करिअरच्या सुरवातीचा काळ सुरू झाला होता, तेव्हा मी दहिसरमध्ये मुलांसोबत एका खोलीत राहिचो. तेव्हा माझी आर्थिक परिस्थीती बेताची होती. त्यावेळी पैसे वाचवण्यासाठी मी आणि माझे मित्र रात्री उशीरा जेवण करासचो आणि सकाळी उशिरा उठून थेट जेवायलाच बसायचो. आम्ही चित्रपटामध्ये काही काम मिळतंय का हे शोधण्यासाठी फिल्म स्टुडिओसला भेट द्यायचो. त्यावेळी आम्हीला एकत्र पाहुन सर्वांना धक्का बसायचा. यादरम्यान टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांची कोणीतरी गोळ्या झाडून हत्या केली होती.”

मानव कौल बोलताना म्हणाला की, “गुलशन कुमार यांच्या हत्येची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी अनेक लोकांना उचलून नेले होते. तेव्हा माझे मित्र आणि मी रात्री पत्ते खेळत होतो. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला दहिसर पोलिस ठाण्यात नेऊन ठेवल. तेव्हा एका अधिकाऱ्यानं मला विचारलं, “तुझा कट्टा कुठे आहे? तू काश्मिरी आहेस?” मी त्यांना सांगितल की मी एक नाटक कलाकार आहे. तेव्हा पोलिसांनी आमची चौकशी केली आणि आम्हाला सोडून दिल.”

मानव कौल विषयी बोलायच झाले तर, ‘तुम्हारी सुलू’, ‘जॉली एलएलबी २’, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तो झळकला होता. तर मानव ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘सीए टॉपर त्रिभुवन मिश्रा’ या वेब सीरिजचा एक भाग आहे, जी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (Actor Manav Kaul made a shocking revelation in the case of Gulshan Kumar’s murder)

अधिक वाचा- 
विद्या बालन गुप्तहेर बनून उलगडणार खुनाचे गूढ? ‘या’ दिवशी प्रदर्शित हाेणार चित्रपट
श्वेता तिवारीच्या ‘या’ मादक फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पाहा फोटो 

हे देखील वाचा