साहित्य अन् चित्रपट जगताला जोडण्यासाठी मानव कौलने थिएटरला बनवला आधार, वाचा अभिनेत्याशी संबंधित खास गोष्टी

असे काही कलाकार असतात, जे प्रत्येक क्षेत्रात आपली आवड दाखवतात आणि आपल्या मेहनतीने त्या क्षेत्रात नाव कमावतात. रंगभूमी हा अभिनेत्याचा आधार असतो आणि रंगभूमीचे यश हे साहित्यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. रंगभूमी, साहित्य आणि सिनेमा यांचे एक नाते आहे. या तिन्ही क्षेत्रांची समज ज्याला समजली तो परिपक्व होतो. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेता-लेखक मानव कौल (Manav Kaul). रविवारी (१९ डिसेंबर) मानव कौलचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक गोष्टी सांगणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Manav Kaul (@manavkaul)

मानव कौलचा जन्म १९ डिसेंबर १९७६ रोजी, काश्मीरमधील बारामुल्ला येथे झाला. त्याचा जन्म एका काश्मिरी पंडिताच्या कुटुंबात झाला. मानव मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे लहानाचा मोठा झाला. बालपणी पोहण्याच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपचाही तो भाग होता. २००४ मध्ये त्याने अरण्य नावाचा थिएटर ग्रुप सुरू केला. या थिएटर ग्रुपसोबत मानवने अनेक नाटके सादर केली. त्यापैकी मुख्य म्हणजे इल्हाम, पार्क आणि शक्कर के पांच दाने. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून थिएटरच्या जगात मानवची ही पहिलीच सुरुवात होती. (happy birthday to actor and author manav kaul birthday story)

View this post on Instagram

A post shared by Manav Kaul (@manavkaul)

मानवला थिएटरशी प्रचंड लगाव आहे. थिएटरच्या काळात त्याने अशी अनेक नाटके लिहिली, जी आजही रंगवली जातात. थिएटरच्या माध्यमातून मानव सिनेमाकडेही वळला. त्याने टेलिव्हिजनपासून सुरुवात केली आणि नंतर सिनेमाकडे आला. त्याने २००३ मध्ये ‘जजंतरम ममंतरम’ मध्ये काम केले. पण त्याला २००७ मध्ये आलेल्या ‘१९७१’ चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटानंतर मानवच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर तो ‘काई पो चे’ आणि ‘सिटीलाइट्स’मध्ये दिसला. यानंतर त्याने ‘वजीर’, ‘जय गंगाजल’, ‘जॉली एलएलबी’ आणि ‘तुम्हारी सुलू’मध्ये काम केले. ‘नेल पॉलिश’ हा त्याचा सर्वाधिक प्रशंसनीय चित्रपट होता, ज्यात त्याने एका विभक्त व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.

View this post on Instagram

A post shared by Manav Kaul (@manavkaul)

लिहिली आहेत बरीच पुस्तके
चित्रपटसृष्टीसोबतच मानव कौलने साहित्य विश्वातही स्थान निर्माण केले आहे. त्याने आत्तापर्यंत ८ पुस्तके लिहिली आहेत. त्याचे प्रत्येक पुस्तक आजही खूप पसंत केले जाते. त्याने आत्तापर्यंत ‘ठीक तुम्हारे पीछे’, ‘प्रेम कबूतर’, ‘तुम्हारे बारे में’, ‘अ नाईट इन द हिल्स’, ‘बहुत दूर कितना दूर होता है’, ‘चलता फिरता प्रेत’, ‘अंतिमा’ और ‘कर्ता ने कर्म से’ ही पुस्तके लिहिले आहेत. त्याची अनेक पुस्तके बेस्ट सेलरच्या श्रेणीतही ठेवण्यात आली आहेत. लेखक आणि थिएटर हे त्याचे पहिले प्रेम आहे, असे अभिनेता आजही सांगतो. साहित्य आणि सिनेमा यांच्यातील खरा संबंध समजणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मानव कौल एक आहे.

हेही वाचा-

Latest Post