Thursday, September 28, 2023

बापरे बाप! मनोज वाजपेयी आहेत 170 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक? अभिनेत्याची रिऍक्शन वाचून व्हाल हैराण

‘सत्या’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांसारखे हिट सिनेमे देणारे दिग्गज अभिनेते मनोज वाजपेयी अलीकडे प्रचंड चर्चेत आहेत. मनोज यांच्याविषयी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, त्यांची एकूण संपत्ती ही 170 कोटी रुपयांच्या आसपास आहे. मात्र, या बातम्यांचे मनोज यांनी खंडन केले. त्यांनी हसत हसत म्हटले की, ते अजूनही आर्थिकरीत्या संघर्ष करत आहेत. आशा आहे की, हे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर निर्माते त्यांचा पगार वाढवतील.

मनोज वाजपेयींचे स्पष्टीकरण
मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी म्हटले की, “असे रिपोर्ट्स वाचल्यानंतर माझी पहिली रिऍक्शन होती की, खरंच असं व्हायला पाहिजे. कमीत कमी, मी कुठल्या तरी दूर ठिकाणी जाऊन माझे आयुष्या आरामात जगू शकलो असतो.” याविषयी बोलताना ते म्हणाले की, “असे यासाठी कारण मी हे करू शकत नाहीये. जर हे माझ्या डोक्यात असते, तर मी लहान असताना असे 25 वर्षांपूर्वीच केले असते. हा मी नाहीये. तो माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. मी फक्त पैशांसाठी काम करू शकत नाही. माझ्यासाठी कला खूप महत्त्वाची आहे आणि त्याबदल्यात मी फक्त एवढीच आशा करतो की, मला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून प्रेम मिळावे.”

मनोज वाजपेयींकडून अफवांचे खंडन
पुढे बोलताना मनोज वाजपेयी यांनी म्हटले की, “मी ज्याप्रकारे काम करत आहे, जसे की, ‘अलीगड’ आणि ‘भोसलें’ यामधून त्याप्रकारचा पैसा कमावणे अशक्य आहे. मी अजूनही पैसे कमावण्यासाठी संघर्ष करत आहे. हे रिपोर्ट्स वाचल्यानंतर मला आशा आहे की, निर्मात्यांनी माझा पगार आता वाढवला पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

खरं तर, अलीकडे अशा बातम्या आल्या होत्या की, मनोज वाजपेयी 170 कोटी संपत्तीचे मालक आहेत. याचे श्रेय त्यांची ब्लॉकबस्टर वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘गुलमोहर’ला दिले जाते. मात्र, आता त्यांनी पुढे येऊन या बातम्यांचे खंडन केले आहे. (actor manoj bajpayee makes fun of reports that are claiming his net worth rs 170 crore)

महत्त्वाच्या बातम्या-
कधीकाळी रस्त्यावर आणि रिक्षावर सिनेमाचे पोस्टर चिटकवायचा ‘हा’ चिमुकला, आज त्याच्यामुळेच हिट होतात सिनेमे
कॅटरिनासारख्या यशस्वी महिलेचा चांगला पती कसा बनायचं? विकी कौशल घेतो ‘या’ गोष्टींची काळजी

हे देखील वाचा