हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या जिवंत अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले. आज आपण अशा एका मुलाबद्दल जाणून घेणार आहोत, जो 90व्या दशकातील अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहे. आजही त्याचा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. या अभिनेत्याच्या भोळेपणासोबतच चाहते त्याच्या अभिनय कौशल्यावरही फिदा आहेत. हा अभिनेता मोजकेच सिनेमे करतो. कारण, त्याला त्याच्या सिनेमात परफेक्शन हवे असते. त्यामुळेच कदाचित त्याला ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हटले जाते.
आता एवढी हिंट दिल्यानंतर चाहत्यांनी नक्कीच ओळखले असेल की, आई-वडिलांसोबत दिसणारा अभिनेता नेमका कोण आहे. जर ओळखले नसेल, तर हा अभिनेता बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आहे. या फोटोत आणिर त्याच्या आई-वडील आणि भाऊ फैजल खान याच्यासोबत उभा आहे. खरं तर, आमिरचे वडील ताहिर हुसैन त्यांच्या काळातील दिग्गज निर्माते होते. आमिरला घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले, पण त्याने स्वत:च्या जोरावर यश मिळवले.
आमिरने ‘लगान’, ‘थ्री इडियट्स’, ‘कयामत से कयामत तक’, ‘दिल’, ‘हम है राही प्यार के’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘दंगल’, ‘पीके’ यांसारख्या हिट सिनेमे दिले. आमिर त्याच्या सिनेमात जिवंतपणा आणतो. त्याने आतापर्यंत जे सिनेमे केले, त्यांची संख्या जरी कमी असली, तरीही ते नेहमीच दर्जेदार आणि शानदार राहिले आहेत.
आमिरचे नाव बॉलिवूडच्या त्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे, ज्यांनी सुरुवातीला संघर्ष केला आहे. आमिर जरी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत आला असेल, पण त्याला बॉलिवूडमध्ये आपली जागा मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. जाणून आश्चर्य वाटेल की, आज सिनेमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा हा अभिनेता कधीकाळी सिनेमाच्या प्रमोशनसाठी रस्त्यावर आणि रिक्षावर पोस्टर चिटकवण्याचे काम करायचा.
‘दिल चाहता है’, ‘फना’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘सरफरोश’, ‘इश्क’, ‘गुलाम’, ‘जो जीता वही सिकंदर’ यांसारखे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या आमिरने इंडस्ट्रीत अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. तसेच, तो आपल्या अभिनयाशी कोणतीही तडजोड करत नाही. निर्माता म्हणूनही आमिर यशस्वी राहिला आहे. त्याचा ‘तारे जमीन पर’ आणि ‘धोबीघाट’ या सिनेमांनी यश मिळवले होते. मागील वर्षी रिलीज झालेला त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमालाही समीक्षकांकडून नावाजले गेले होते.
आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिरचे पहिले लग्न रीना दत्ता हिच्यासोबत झाले होते. तिच्याकडून आमिरला 2 मुले आहेत. मात्र, रीनासोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने किरण रावसोबत संसार थाटला. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगाही आहे. मात्र, किरण आणि आमिर वेगळे झाले असूनही ते दोघेही मुलाचा मिळून सांभाळ करतात.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅटरिनासारख्या यशस्वी महिलेचा चांगला पती कसा बनायचं? विकी कौशल घेतो ‘या’ गोष्टींची काळजी
फ्लॉप ‘Adipurush’ सिनेमाची फुल अँड फायनल कमाई आली समोर, प्रभासला मात्र एका गोष्टीचे समाधान