Tuesday, September 26, 2023

कॅटरिनासारख्या यशस्वी महिलेचा चांगला पती कसा बनायचं? विकी कौशल घेतो ‘या’ गोष्टींची काळजी

बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांमध्ये गणली जाणारी जोडी म्हणजे विकी कौशल आणि कॅटरिना कैफ होय. हे जोडपं नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कलाकार जोडपे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी अजिबात सोडत नाहीत. दोघेही नेहमी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. तसेच, नेटकरीदेखील या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. अशातच विकी कौशलेने माध्यमांशी बोलताना चांगला पती बनण्यासाठी टिप्स दिल्या आहेत.

विकी कौशलने दिल्या टिप्स
विकी कौशल (Vicky Kaushal) याने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने विवाहित आयुष्याविषयीही भाष्य केले. त्याने सांगितले की, तो आपली पत्नी कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिला कशाप्रकारे समजून घेतो आणि समजून सांगतो. एवढंच नाही, तर त्याने चाहत्यांना चांगला पती बनण्यासाठी अनेक टिप्सही दिल्या आहेत.

काय म्हणाला विकी कौशल?
विकी म्हणाला की, “कॅटरिना कैफ खूपच भावूक आहे. मात्र, कामाविषयी ती व्यवहारचतुर (प्रॅक्टिकल) होते. ती इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच काळापासून आहे, तेव्हा तिला सर्वकाही चांगल्याप्रकारे माहितीये. तिच्या या समंजस्यामुळे मलाही मदत होते. जर एक यशस्वी महिलेचा चांगला पती बनायचे असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम एक चांगला व्यक्ती बनावे लागेल.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “अनेकदा तुम्हाला अशा गोष्टी करणे सोडाव्या लागतील, ज्या फक्त तुम्हाला करायला आवडतात. कारण, लग्नानंतर गोष्टी दोघांबाबत आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकी आणि कॅटरिनाचे लग्न
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचा 2022मध्ये शाही विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असताच. यापूर्वी विकी आणि कॅटरिनाने 1 ते 2 वर्षे डेट केले होते.

विकी कौशलचे सिनेमे
विकी कौशल अखेरचा ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत होती. विकीच्या आगामी सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर तो ‘सॅम बहादूर’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर, 2023 रोजी रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
फ्लॉप ‘Adipurush’ सिनेमाची फुल अँड फायनल कमाई आली समोर, प्रभासला मात्र एका गोष्टीचे समाधान
रजनीकांत ते पवन कल्याण, ‘या’ 7 सुपरस्टार्सने लपवली खरी ओळख! प्रसिद्धीसाठी बदलले आपले नाव, पाहा यादी

हे देखील वाचा