Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड कोरोनामुळे अभिनेते मिथुन चक्रवर्तींनाही बसला होता मोठा फटका; व्यथा मांडत म्हणाले, ‘एक कप कॉफीही…’

कोरोनामुळे अभिनेते मिथुन चक्रवर्तींनाही बसला होता मोठा फटका; व्यथा मांडत म्हणाले, ‘एक कप कॉफीही…’

जगाला कोरोना विषाणूने वेढले होते, त्यावेळी शासनाला कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला होता. त्याचमुळे त्याचा अनेक लोकांच्या व्यवसाय, नोकऱ्या इत्यादींवर परिणाम झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेकांचे जगणे देखील कठीण झाले होते. मात्र, याचा त्रास सर्वसामान्यांनाच झाला असे नाही. खास आणि व्हीआयपी व्यक्तींनाही याचा फटका बसला. ‘हुनरबाज… देश की शान’चे परीक्षक आणि दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही लॉकडाऊनमध्ये त्यांना किती समस्यांचा सामना करावा लागला आणि किती नुकसान झाले? याचा खुलासा केला आहे.

मिथुन यांनी केला खुलासा
मिथुन यांनी या शोमध्ये खुलासा केला की, त्यांनाही कोरोनाच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या हॉटेलची अवस्था अशी झाली की, एक कप कॉफीही विकली जात नव्हती. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मिथुन यांनी सांगितले की, ‘हुनरबाज… देश की शान’मध्ये काम करायला मला खूप आवडते. मिथुन म्हणाले की, “करण जोहर आणि परिणीती चोप्रासोबत काम करणे खूप आनंददायी आहे.” यावेळी त्यांनी लॉकडाऊनबद्दलही सांगितले.

‘मी बिझनेसमनही आहे’
मिथुन (Mithun Chakraborty) म्हणाले की, “मी फक्त अभिनेता नाही, तर एक बिझनेसमनही आहे. माझ्याकडे अनेक हॉटेल्स आहेत, पण एक वेळ अशी आली जेव्हा हॉटेलमध्ये एकही कॉफी विकली जात नव्हती. कारण कोरोनाने सर्व काही बिघडवले होते. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सरकारकडून आम्हाला कोणतेही सहकार्य मिळाले नाही. पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगावरही परिणाम झाला.” कामगारांचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्यांचे काय झाले असेल या विचाराने ते अस्वस्थ होतात.

मिथुन यांनी सांगितले की, त्यांनी हॉटेलच्या कर्मचार्‍यांसोबत उभे राहण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, परंतु एक वेळ आली जेव्हा त्यांना कर्मचार्‍यांना थांबण्यासाठी सांगावे लागले. त्यांनी तर असेही म्हटले की, “मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, व्यवसायातून जे पैसे येत आहेत, ते तुम्ही सर्वांनी वाटून घ्या. मी माझ्या बाजूने बघेल. मी स्वतःलाही समजावले की, हे सर्व काही कायम राहणार नाही, एक वेळ येईल जेव्हा हे देखील निघून जाईल.”

हेही पाहा- कोणी पैश्यांसाठी तर कोणी प्रेमासाठी घेतला प्रसिद्ध अभिनेत्रींचा जीव

मिथुन चक्रवर्ती, करण जोहर आणि परिणीती चोप्रा ‘हुनरबाज… देश की शान’ला परीक्षण करत आहेत. या शोमधून परिणीती चोप्राने टीव्ही जगतात पदार्पण केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा