×

सलमानसोबत ‘लकी’ सिनेमात दिसली होती ‘ही’ अभिनेत्री, ४ वर्ष गंभीर आजाराशी लढा दिल्यानंतर आता दिसतेय ‘अशी’

तुम्हाला सलमान खानच्या (Salman Khan) ‘लकी’ चित्रपटातील हिरोईन तर आठवतच असेल, ज्याची त्या काळात ऐश्वर्या रायसोबत (Aishwarya Rai) तुलना करण्यात आली होती. होय, आम्ही बोलत आहोत स्नेहा उल्लालबद्दल (Sneha Ullal), जिने ‘लकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. स्नेहा उल्लाल हा सलमान खानचा शोध असल्याचं म्हटलं जातं. अर्थात स्नेहा उल्लालला अपेक्षित असं यश बॉलिवूडमध्ये मिळवता आलं नाही. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या आयुष्याची झलक देत राहते. ती अनेकदा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. स्नेहाने बॉलिवूडसोबतच साऊथमध्येही काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sneha Ullal (@snehaullal)

स्नेहाने २००५ मध्ये ‘लकी-नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाद्वारे सलमानने तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. त्यानंतर स्नेहा उल्लालची तुलना ऐश्वर्या रायशी करण्यात आली. स्नेहा तेव्हा केवळ १८ वर्षांची होती.

View this post on Instagram

A post shared by Sneha Ullal (@snehaullal)

स्नेहा ही सलमानची बहीण अर्पिताची चांगली मैत्रीण आहे. तिच्या माध्यमातूनच ती सलमानच्या संपर्कात आली. नंतर स्नेहा उल्लाल म्हणाली होती की, ऐश्वर्याशी तिची तुलना करणे हा पीआर स्ट्रॅटेजीचा भाग होता. तिला तुलना करायला हरकत नव्हती, पण ती एका विशिष्ट व्यक्तीवर केंद्रित होती.

View this post on Instagram

A post shared by Sneha Ullal (@snehaullal)

लकीनंतर स्नेहाने ‘आर्यन’, ‘जाने भी दो यारों’ आणि ‘क्लिक’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले, पण हे चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. ‘बेजूबान’ चित्रपटानंतर ती पडद्यावरून गायब झाली होती. नंतर स्नेहा उल्लालने सांगितले की, ती रक्ताशी संबंधित आजाराशी लढत होती आणि चार वर्षे तिला तिच्या पायावर उभे राहणे देखील कठीण होते. तर आता ती बरी आहे. ती शेवटची ‘एक्सपायरी डेट’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by Sneha Ullal (@snehaullal)

प्रदीर्घ गॅपनंतर तिला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करायचे आहे, पण ती कामासाठी सलमानकडे जाणार नसल्याचे तिने सांगितले. सलमान खूप चांगला माणूस आहे, पण तिला स्वत:चं करिअर करायचं आहे, असेही ती म्हणाली.

हेही वाचा :

Latest Post