Friday, March 29, 2024

पिटी टीचर आणि पोलीस ऑफिसर असणाऱ्या राजकुमार राव – भूमी पेडणेकरच्या जोडीची अतरंगी कहाणी म्हणजे ‘बधाई दो’

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर अभिनित ‘बधाई दो’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, हा चित्रपट एक मजेदार कॉमेडी आहे. चित्रपटात दोघांची केमिस्ट्री धमाका करणार याची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचा एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राजकुमार आणि भूमी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सोबत काम करताना दिसणार आहेत.

‘बधाई दो’चा ट्रेलर प्रदर्शित

हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित ‘बधाई दो’ च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) एका अशा मुलीच्या भूमिकेत दिसते, जिला लग्न करायचे नाही. ३१ वर्षांची होत आलीस कधी लग्न करशील, असे तिची आई म्हणते. भूमी स्पोर्ट्स कोचच्या भूमिकेत दिसत आहे.  त्याचवेळी राजकुमार (Rajkumar Rao) त्याची बॉडी दाखवताना दिसतो. राजकुमार भूमीला भेटतो आणि पुढे काही काळाने त्यांचे लग्न होते. कुटुंब नियोजनासाठी त्यांचे कुटुंब दबाव त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात करतात. यादरम्यान या दोघांबद्दलचे एक गुप्त असलेले सत्य देखील सर्वांना समजते. आता ते सत्य घरच्यांसमोर येणार का? घरचे ते सत्य स्वीकारणार का? पुढे काय होणार आदी अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार असल्याचे ट्रेलरवरून दिसते.

‘बधाई दो’मध्ये राजकुमार आणि भूमी यांच्याशिवाय सीमा पाहवा, शीबा चढ्ढा, लवलीन मिश्रा या कलाकारांच्या भूमिका आहेत. या ट्रेलरच्या प्रदर्शनाची माहिती देताना जंगली पिक्चर्सने मजेशीरपणे लिहिले की, “अतरंगी लग्नाच्या सतरंगी सेटिंगच्या प्रेमाच्या महिन्यात साक्षीदार व्हा. ‘बधाई दो’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”

‘बधाई दो’ची कथा ‘बधाई हो’पेक्षा वेगळी आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटात राजकुमार एका महिला पोलिस स्टेशनमधील पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भूमी या चित्रपटात लेस्बियन पीटी टीचरच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान खुराना, गजराज राव, नीना गुप्ता आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत असलेल्या २०१८ च्या ‘बधाई हो’ चित्रपटापेक्षा ‘बधाई दो’ ची कथा आणि पात्रे वेगळी आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा