समंथा अन् नागा चैतन्यच्या भांडणात नागार्जुन यांनी घेतली उडी, मुलगा चैतन्यविषयी सांगितला खतरनाक किस्सा


दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने यशाच्या किल्ल्यावर आपले नाव कोरणारे अभिनेते म्हणजे नागार्जुन. सध्या अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचा मुलगा नागा चैतन्य देखील यशस्वी चित्रपट देण्यास सज्ज झाला आहे. समंथा अक्किनेनी ही त्याची पत्नी असून या दोघांची जोडी काही काळ आधी सोशल मीडियावर चांगल्या बातम्यांसाठी चर्चेत होती. परंतु गेले काही दिवस या दोघांमधील वादांमुळे सोशल मीडियावर त्यांच्या भांडणांविषयाचीच माहिती पाहायला मिळत आहे. या पती पत्नीच्या वादामध्ये आता सासरे बुवांनी म्हणजेच नागार्जुन यांनी उडी घेतली आहे.

नागार्जुन यांनी आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या वादामध्ये स्वतःचे डोके खुपसले आहे. खरं तर हे सर्व त्यांनी आपल्या मुलाचा संसार वाचावा या काळजी पोटीच केले आहे. परंतु पती- पत्नीच्या वादावर सासरे बोलले म्हणून सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या वादापेक्षा नागार्जुन यांनी केलेल्या वक्तव्याचीच चर्चा सुरू आहे. (Actor nagarjuna trying to patch up between Naga and Samantha married life)

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागार्जुन म्हणाले की, “असं काही नाही की, नागा चैतन्यने कोणता अपराध केला आहे. त्याने कधीच त्याच्या पत्नीला फसवले नाही. साल २०१७ मध्ये लग्नगाठीमध्ये अडकल्यापासून तो एक उत्तम आणि खूप प्रेम करणारा पती राहिला आहे.”

तसेच आपल्या मुलाच्या बाजूने बोलत असताना पुढे एक किस्सा सांगत ते म्हणाले की, “‘मंजली’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्याला अभिनेत्रीवर रागवायचे होते, परंतु त्याला तसे करता आले नाही. तसं करायला त्याला खूप त्रास होत होता. राग अनावर झालेल्या डोळ्यांनी तो स्वतःच्या पत्नीकडे पाहूही शकत नव्हता. तिरस्कार भरलेल्या त्या डोळ्यांनी त्याला कॅमेरा देखील फेस करता येत नव्हता. आता नागाला त्याच्या पत्नीबरोबर असलेले संबंध ठीक करण्यासाठी सांगितलं जात आहे, तर मला समजत नाहीये मी नेमकी सुरुवात कोठून करू.” शेवटी नागार्जुन आपले म्हणणे पूर्ण करत म्हणले की,”ते दोघे ही त्यांच्या लग्नासंबंधीत सर्व समस्या लवकरच सोडवतील आणि त्यांना त्यांच्या वादाचे कारणही माहित आहे.”

समंथाने नाकारले पतीचे नाव
समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य या दोघांमधील वाद मीडियासमोर तेव्हा चर्चेत आले, जेव्हा समंथाने तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून तिच्या पतीचे नाव हटवले. तिने त्याचे नाव कमी करून फक्त ‘एस’ एवढेच लिहिले. त्यांनतर नेमके काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये दिसू लागली. नागा चैतन्यच्या पत्नीने असे केल्यानंतरच त्या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आले, पण त्यांनतर समंथा मीडियावर चांगलीच चिढली. तिने रागामध्ये या सर्वांची तुलना कुत्र्यांशी देखील केली. त्यानंतर या दोघांमधील वादाच्या वृत्ताने तेव्हा डोके वर काढले, जेव्हा ती आपल्या मित्रपरिवारासह आणि नागा चैतन्य शिवाय गोव्याला सुट्ट्या एन्जॉय करायला गेली.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्याचा ‘लव्ह स्टोरी’या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामधील स्टोरी समंथाला खूप आवडली. तिने कौतुकाच्या शब्दात एक ट्वीट केले आणि बघता बघता तिचे हे ट्वीट खूप व्हायरल झाले. तिने नागाच्या ट्विटला रिट्विट करत असे लिहिले की, “तुम्ही सगळे जिंकलेले आहात.” यामध्ये तिने चित्रपटातील सर्व कलाकारांना टॅग केले परंतु आपल्या पतीचे नाव कुठेच नाही घेतले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत

-जेव्हा पितृसत्तेचा विरोध करत मल्लिकाने झापले वडिलांना; म्हणाली होती, ‘तू मला जन्म दिलास म्हणून…’


Leave A Reply

Your email address will not be published.