‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत


सर्वत्र गौरी गणपतीचा सण साजरा होत आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. अशातच गौरीचे आगमन देखील झाले आहे. त्यामुळे गौराईचे खेळ, गाणी, सजावट या गोष्टी सर्वत्र पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींच्या घरी देखील गौरीचे आगमन झाले आहे. अनेक अभिनेत्री त्यांच्या घरातील गौराईसोबत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या गौराईसोबत एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसी खूपच सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. गळ्यात मंगळसूत्र आणि एक नेकलेस घातला आहे. यासोबत हातात हिरवा चुडा घातला आहे. तसेच तिच्या आजूबाजूला अनेक बायका दिसत आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘आली गवर आली सोनपावली’ हे गाणे लागले आहे. या गाण्यावर ती डान्स देखील करताना दिसत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. (Marathi actress Manasi naik share a video with gauri on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “सोन्या मोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई. पंच पक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा आरतीची घाई. अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया. घरादारा लाभो सदा कृपेची छाया.” तिने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला हा सण तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.