रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट


देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्मिती कंपनी रिलायन्स एन्टरटेन्मेंटने हॉलिवूडचे प्रख्यात निर्माता- दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गसोबत भागीदार म्हणून काम केले आहे. प्रथम ड्रीमवर्क्स स्टुडिओ आणि एँब्लिन पार्टनर्सनंतर रिलायन्स एन्टरटेन्मेंटने आता हिंदी चित्रपट कंपनी टी-सीरिजशी हातमिळवणी केली आहे. रिलायन्स एन्टरटेन्मेंट आणि टी-सीरिजने संयुक्तपणे १० चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. तसेच हे चित्रपट बनवण्यासाठी सुमारे १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासही सहमती दर्शवली आहे. हे १० चित्रपट कोणते असतील आणि त्यात कोणते कलाकार असतील, हे अद्याप उघड झालेले नाही. परंतु ऋतिक रोशन आणि सैफ अली खानच्या मुख्य भूमिकेत ‘विक्रमवेधा’ या दक्षिण भारतातील हिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकने याची सुरुवात होईल.

उल्लेखनीय आहे की, टी-सीरिज कंपनी आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंट यांच्यात आतापर्यंत संगीताच्या विपणनासाठी दीर्घ भागीदारी झाली आहे. या भागीदारी अंतर्गत दोन्ही कंपन्यांनी सुमारे १०० चित्रपटांवर काम केले आहे, पण ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मुंबईच्या दोन मोठ्या स्टुडिओने एकत्र चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या अंतर्गत मनोरंजनात्मक आशय तयार करण्याच्या दूरगामी योजनेवर काम सुरू झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या १० पैकी तीन चित्रपट मेगा बजेट चित्रपट आहेत. या चित्रपटांमध्ये टॉप कलाकार आणि तंत्रज्ञ काम करत आहेत. रिलायन्स एन्टरटेन्मेंट आणि टी-सीरिजच्या या १० चित्रपटांमध्ये अनेक निर्माणाधीन चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे. या भागीदारीच्या घोषणेने उघड झालेल्या चित्रपटांमध्ये तमिळ ब्लॉकबस्टरचा हिंदी रिमेक, एक ऐतिहासिक बायोपिक, एक हेरगिरी थ्रिलर, एक कोर्टरुम ड्रामा, एक व्यंगात्मक विनोदी चित्रपट, एक रोमँटिक नाटक आणि एक सत्य घटनांवर आधारित चित्रपट यांचा समावेश आहे.

याबद्दल बोलताना रिलायन्स एन्टरटेन्मेंटच्या ग्रुपचे सीईओ शिबाशीष सरकार म्हणाले की, “टी-सीरिजसोबतच्या या भागीदारीबद्दल मला खूप आशा आहे. हे भारतीय चित्रपट उद्योगासाठी एका नवीन उत्सवाची सुरुवात आहे आणि त्याच संकल्पाबरोबर आम्ही लवकरच ऑफबीट आणि विशेष क्षणांच्या चित्रपटांचा पुष्पगुच्छ घेऊन येणार आहोत.”

पुढील दोन ते तीन वर्षांत बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांशी निगडीत दिग्दर्शकांची नावे पुष्कर आणि गायत्री, विक्रमजीत सिंग, मंगेश हदावले, श्रीजित मुखर्जी आणि संकल्प रेड्डी यांचा समावेश आहे. रिलायन्स एन्टरटेन्मेंटने यापूर्वी रोहित शेट्टी, इम्तियाज अली, नीरज पांडे, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी, अनुराग कश्यप, रिभु दासगुप्ता इत्यादींच्या भागीदारीत अलीकडच्या काळात चित्रपटांची निर्मिती केली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे ३०० लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. असे म्हटले जात आहे की, सोमवारी (१३ सप्टेंबर) जाहीर झालेल्या १० चित्रपटांपैकी चार किंवा पाच चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्यासाठी तयार असू शकतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.