Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजमध्ये करायचे नव्हते नवाजुद्दीन सिद्दीकीला काम, स्वत:च सांगितले कारण

काय सांगता! ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजमध्ये करायचे नव्हते नवाजुद्दीन सिद्दीकीला काम, स्वत:च सांगितले कारण

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी ओटीटीवर पदार्पण करून आपल्या कारकिर्दीली कलाटणी दिली आहे. यापैकीच एक अभिनेता म्हणजे, नवाजुद्दीन सिद्दीकी होय. नवाजुद्दीनने ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजपासून आपल्या ओटीटीवरील प्रवासाची सुरुवात केली होती. या वेबसीरिजमधून त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. त्याने नुकतेच माध्यमांशी बोलताना ओटीटीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

नलाजुद्दीनने आपल्या प्रवासाबाबत बोलताना सांगितले की, “जेव्हा मी सेक्रेड गेम्सपासून सुरुवात केली, तेव्हा मला ओटीटी म्हणजे काय हे देखील माहित नव्हते. मला माहित होते की, एक टीव्ही मालिका प्रकार असेल, जी मला करायची नव्हती. कारण, मला त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. विक्रम मोटवानी १-२ महिने प्रयत्न करत राहिले, पण मला टीव्ही मालिका करायची नाहीत असे सांगून मी टाळत राहिलो.” (Actor Nawazuddin Siddiqui Say No To Web Series On OTT Platform)

“यानंतर त्यांनी मला सांगितले की, ही टीव्ही सीरियल नसून ती एकाच वेळी १९० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर मी त्यावर विचार करू लागलो आणि खात्रीसाठी अनुरागशी बोललो. हे खरे आहे आणि चित्रपटासारखे चित्रित केले जाईल, असे त्यांनी मला सांगितले आणि त्यांनी मला गणेश गायतोंडेची भूमिका दिली आणि ही भूमिका फैजल खानपेक्षाही वर नेईल असे सांगितले,” असे पुढे बोलताना नवाजुद्दीन म्हणाला.

नवाजुद्दीनला झाली ओटीटीच्या ताकदीची जाणीव
पुढे बोलताना नवाजुद्दीने म्हटले की, “संपूर्ण चित्रपटाप्रमाणे शूटिंग झाली. जेव्हा हे प्रदर्शित करण्यात आले, तेव्हा खूपच प्रशंसा मिळाली. त्यावेळी मला पहिल्यांदा ओटीटीची ताकद समजली. यानंतर मी कोणत्याही ओटीटीमध्ये काम केले नाी. केवळ एकच वेबसीरिज केली आहे, ‘सेक्रेड गेम्स.'”

“आता ओटीटीवर गुणवत्ता नाही”
ओटीटीबद्दल नवाजुद्दीनचे आज काय म्हणणे आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, “आपल्या इंडस्ट्रीची समस्या ही आहे की, एखादी गोष्ट चांगल्या कारणासाठी समोर आली, तर त्याला व्यवसाय बनवले जाते. कलेत व्यवसाय आवश्यक आहे, पण त्याला पूर्ण व्यवसाय केला, तर त्याला काही अर्थ नाही. आज बरीच मोठी प्रोडक्शन हाऊस आहेत, ते ओटीटीकडून पैसे काढत आहेत. कारण, त्यांना गुणवत्तेची पर्वा नाही. त्यामुळे टीव्ही सीरियल्स आणि ओटीटी बघितल्या, तर आता सारख्याच दिसू लागल्या आहेत. काही प्रमाणात, २ वर्षांपूर्वीपर्यंत ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आता तो एक मोठा व्यवसाय बनला आहे.”

वेबसीरिजमध्ये काम नाही करणार नवाजुद्दीन
आता ओटीटीसाठी ऑफर आली, तर नवाजुद्दीन स्वीकारणार का? यावर अभिनेता म्हणाला, “माझ्याकडे अनेक ऑफर आहेत, पण मी एकही केले नाही आणि करणारही नाही. कोणतीही मालिका करणार नाही. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित होणार्‍या मूळ चित्रपटाची ऑफर आल्यास तो नक्कीच करेन.”

अभिनेत्याने केली ‘या’ कलाकारांची प्रशंसा
अभिनेता नवाजुद्दीनने असेही सांगितले की, “अनेक अभिनेते ओटीटीमधून पुढे आले आहेत, ज्यांना कदाचित चित्रपटातून ब्रेक मिळत नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. यांमध्ये जयदीप अहलावत, प्रतीक गांधी, राजेश तेलंग यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.”

नवाजुद्दीनबाबत बोलायचं झालं, तर तो शेवटचा २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या, ‘सिरियस मेन’ चित्रपटात झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, हॉट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-कपूर बहिणी झाल्या ट्रोल! जान्हवी अन् खुशीने दिलेली पोझ पाहून, नेटकरी विचारतायेत ‘असे’ प्रश्न

हे देखील वाचा