Tuesday, February 3, 2026
Home अन्य नील आणि ऐश्वर्या यांच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री रेखा यांची हजेरी, त्यांना पाहून नवदांपत्याला बसला सुखद धक्का

नील आणि ऐश्वर्या यांच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री रेखा यांची हजेरी, त्यांना पाहून नवदांपत्याला बसला सुखद धक्का

लोकप्रिय टीव्ही शो ‘गुम है किसीके प्यार में’ फेम अभिनेता नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा नुकतेच लग्नबंधनात अडकले. ऐश्वर्या आणि नील यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर) लग्नगाठ बांधली. गुरुवारी संध्याकाळी मुंबईत या जोडप्याने आपल्या खास मित्रांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी आपल्या उपस्थितीने पार्टीत एक वेगळीच मजा आणली. तसेच, ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या संपूर्ण स्टारकास्टने नील आणि ऐश्वर्याचे हे सेलिब्रेशन आणखी खास बनवले.

पण, जेव्हा रेखा स्वतः त्यांच्या रिसेप्शनला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचल्या तेव्हा दोघांनाही आश्चर्य वाटले. रेखा यांना पाहून नील आणि ऐश्वर्याचा आनंद पाहण्यासारखा होता. दोघांनी धावत जाऊन रेखा यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यावेळी रेखा गोल्डन कलरच्या साडीत दिसल्या. ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती. नील आणि ऐश्वर्याच्या रिसेप्शनमध्ये रेखाला पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही खूप खुश झाले. रेखा यांनी या शोमध्ये सूत्रसंचालकांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे अनेक प्रोमो देखील व्हायरल झाले होते.

नील आणि ऐश्वर्याच्या रिसेप्शनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये दोघेही ‘टू स्टेट्स’मधील ‘मस्त मगन’ गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत असून, दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत. या रिसेप्शनमध्ये नीलने निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता आणि ऐश्वर्याने सिल्व्हर गाऊन घातला होता. हा व्हिडिओ पाहून आपण अंदाज लावू शकतो की, ऐश्वर्या आणि नील त्यांच्या लग्नाबद्दल किती उत्सुक होते. या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील या सर्वात खास क्षणाचा मनमुराद आनंद लुटला. हा व्हिडिओ नील-ऐश्वर्याच्या फॅन क्लबने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये नील आणि ऐश्वर्या त्यांच्या रिसेप्शनच्या ठिकाणी येताना दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असून, नील आणि ऐश्वर्या एकमेकांचा हात धरून लोकांकडून शुभेच्छा स्वीकारताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

‘गम है किसी के प्यार में’मध्ये नील आयपीएस विराटची भूमिका साकारत आहे आणि ऐश्वर्या पत्रलेखाची भूमिका साकारत आहे. मालिकेच्या सुरुवातीला विराट आणि पत्रलेखा एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण परिस्थितीमुळे पत्रलेखाचा विवाह विराटचा मोठा भाऊ सम्राटशी होतो आणि विराटचा सईशी होती. पण पाखी अजूनही विराटला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा