Tuesday, May 21, 2024

‘लागिरं झालं जी’ फेम नितिशची ‘ती’ पोस्ट व्हायरल; युजर म्हणाले, ‘अंगावर काटा येत‌ होता…’

झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी‘ या मालिकेने चाहत्याच्या मनात एक विषेश जागा निर्माण केली आहे. त्यातील अनेक कलाकारांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माम केली आहे. त्यातील अज्याची भूमिका अभिनेता नितिश चव्हाणने साकारली आहे. त्या भूमिकेमुळे नितिशला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

नितिश (Nitish Chavan ) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. नुतकताच नितिशने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.जो सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठकत आहे. या व्हिडिओमध्ये नितिश सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना नितिशने कॅप्शन लिहिले की, “चाल रं गड्या तू पुढं.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नितिश एका मुलाला बोलताना दिसत आहे. ते दोघे साताऱ्यातील एका रत्यावर उभा आहेत. नितिश देवसागर ढाले नावाचा गरजू मुलगा सोबत बोलत आहे.

यावेळी बोलताना नितिश त्या मुलाला विचारतो की, तु हे काम का करत आहे. त्यावर देवसागर घरची परिस्थी सांगतो. त्याला वडिल नाहीत. म्हणून तो अगरबत्त्या विकतो. देवसागर आता नववीमध्ये शिकत आहे. या व्हिडिओच्या शेवटी नितिश देवसागर कुठे अगरबत्त्या विकताना दिसला तर त्याच्याकडून अगरबत्त्या विकत घ्या आणि त्याला मदत करा, असे आवाहन करताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitish Chavan (@nitish__chavan)

तसेच “कितीही काही झाले तरीही आईची जबाबदारी आणि शिक्षण सोडून नकोस” हा मोलाचा सल्ला नितिश देवसागरला देतो. सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकरी यावर खूर साऱ्या कमेंट करत आहेत. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “दादा, असेच समाजकार्य करत राहा…” दुसऱ्याने लिहिले की, “अंगावर काटा येत‌ होता हे सर्व बघताना. खरंच परिस्थिती माणसाला खुप काही शिकवते , खरंच अभिमान आहे सर तुमचा तुम्ही त्या तरुणाला मदत केली.” (Actor Nitish Chavan of ‘Lagir Jala Ji’ fame helped a needy child)

अधिक वाचा- 
– ‘पांव रुके ना किसीके…’,साेनाली कुलकर्णीची ‘ती’ पाेस्ट चर्चेत
रामचरणच्या लेकीचं बारसं धुमधडाक्यात संपन्न; वाचा आजोबांनी काय ठेवलंय नातीचं नाव

हे देखील वाचा