Sunday, May 19, 2024

रामचरणच्या लेकीचं बारसं धुमधडाक्यात संपन्न; वाचा आजोबांनी काय ठेवलंय नातीचं नाव

तेलगू सुपरस्टार राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचा 30 जून रोजी बारसं सोहळा पार पडला. दोघांनीही आपल्या मुलीचे नाव कलिन कारा कोनिडेला ठेवले आहे. याची घोषणा या जोडप्याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली आहे. दोघांनी संपूर्ण कुटुंबासोबत फोटो शेअर करत आपल्या मुलीच्या नावाची माहिती दिली. या फाेटाेंमध्ये संपूर्ण कुटुंब पारंपारिक वेशभूषेत दिसत होते.

अशात आता उपासनाची आई शोभना कामिनेनी म्हणाल्या की, ‘तयांना उपासनाचे नाव कालिन कारा ठेवायचे हाेते. अशात आपल्या नातीनचे नाव कालिन कारा ठेवल्याबद्दल त्यांनी आपल्या पोस्टमध्ये राम चरण आणि उपासना यांचे आभार मानले आहेत. शोभना कामिनेनीने त्यांच्या इंस्टाग्रामवर बारसं समारंभाचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “उपासना, तुझा जन्म झाला, तेव्हा मला तुझे नाव कालिन कारा ठेवायचे होते. सर्वात परिपूर्ण बाळासाठी तुम्हा दोघांचे (राम आणि उपासना) यांचे आभार. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो कारा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shobana Kamineni (@shobanakamineni)

मुलीचे नाव सर्वांसोबत शेअर करताना उपासनाने इंस्टाग्रामवर लिहिले, “ललिता सहस्रनामातून घेतलेल्या नावाचा अर्थ आध्यात्मिक जागृति आणणारे उर्जेचे प्रतीक आहे. आजी-आजोबांकडून आमच्या मुलीला खूप मिठी.” व्हिडिओ शेअर करताना, राम चरणने मुलीचे नाव उघड केले आणि कॅप्शनमध्ये व्हाइट हार्ट इमोजी पोस्ट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

राम आणि उपासना यांचा विवाह 14 जून 2012 रोजी झाला. डिसेंबर 2022मध्ये या जाेडप्याने प्रेग्नंसीची घोषणा केली आणि 20 जून रोजी त्यांना मुलगी झाली.(tollywood actor ram charan celebrates his daughter naming ceremony know about her unique name )

आधिक वाचा- 
‘बाईपण भारी देवा’ पाहून थिएटरबाहेर येताच आदेश बांदेकर भावुक; केदार शिंदेंना मारली मिठी
‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?

हे देखील वाचा