नोरा फतेही बॉलिवूडचा असा चेहरा बनली आहे, जिने आपल्या डान्सने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. जेव्हाही नोरा फतेही कोणत्याही गाण्यात दिसली आहे, ते गाणे सुपरहिट झाले आहे आणि तिच्या डान्सला चाहत्यांनी दाद दिली आहे. नोरा फतेहीचे डान्स व्हिडिओ युट्यूबपासून सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात. नुकताच तिचा आगामी चित्रपट ‘सत्यमेव जयते २’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘कुसू कुसू’ गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याच गाण्यातील तिचा लूक नोराने सोशल मीडियावर शेअर करून आग लावली आहे.
अलीकडेच नोराचे ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटातील ’कुसू कुसू’ गाणे प्रदर्शित झाले आहे. याच गाण्यातील नोराने तिचा लूक शेअर केला आहे. ज्यात ती डिझायनर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासह तिने सुंदर असा मेकअप केला आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिच्या या फोटोंना ११ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यासह चाहते स्वतःला नोराच्या या फोटोंवर कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. तिच्या या फोटोंवर चाहते लाल हार्ट आणि फायर ईमोजी वापरून प्रतिक्रिया देत आहेत.
‘सत्यमेव जयते २’ चित्रपटातील ‘कुसू-कुसू’ या गाण्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेले हे गाणे युट्यूबवर तूफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, नोरा फतेहीही या गाण्याच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडली नाही.
नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. अलीकडेच ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. एवढेच नाही, तर नोरावर चित्रित केलेली अनेक गाणी सुपरहिट होत आहेत. तिची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा ‘बिग बॉस’च्या घराचाही एक भाग राहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मौनी रॉयच्या पिपाणीवर ‘नागराज’ बनून रणवीर सिंगने धरला ठेका, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
-हे भारीये! सोशल मीडिया ट्रेंडिंगवर पाहायला मिळाला ‘धकधक गर्ल’चा वेगळाच अंदाज, तुम्हीही व्हाल घायाळ
-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार