मौनी रॉयच्या पिपाणीवर ‘नागराज’ बनून रणवीर सिंगने धरला ठेका, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट


निर्माती एकता कपूरने जेव्हापासून तिच्या ‘नागिन’ या मालिकेच्या पुढच्या पार्टची घोषणा केली आहे, तेव्हापासून या मालिकेचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. एकता कपूरने ‘नागिन ६’ च मुख्य अभिनेत्रीच्या नावाची ‘बिग बॉस १५’ मध्ये हिंट दिली होती. तसेच हे सांगितले की, दुसऱ्या नागिनचा शोध चालू आहे. नुकतीच एकता रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ मध्ये पोहोचली होती, तेव्हा तिच्यासोबत मौनी रॉय देखील होती. एकताने मौनीसोबत नागिन मालिका सुरू केली होती. मौनी तिची पहिली नागिन होती.

एकता कपूरला बघताच रणविर सिंगला ‘नागिन’ या मालिकेची आठवण आली आणि तो म्हणाला की, “मॅडम आल्या आहेत तर, नागराजची ऑडिशन देऊन ठेवतो.” त्यानंतर रणवीर सिंगला नागाचा मुकुट घातला जातो. एकता जसे ऍक्शन असे म्हणाली, तेव्हा मौनी रॉयने पिपाणी वाजविण्यास सुरुवात केली आणि सोबतच ‘मैं तेरा दुश्मन’ हे गाणे सुरू केले. (Ranveer Singh turns naagraaj and gives naagin audition to ekta kapoor Mouni Roy plays been )

यावेळी रणवीर एकदम नागराज मोडमध्ये जातो. तो सापाप्रमाणे स्टेजवर लोळून डान्स करतो. हे पाहून एकता कपूर हसून हसून लोटपोट होते. रणवीर एकता कपूरला प्रभावित करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्याचा डान्स पाहून एकता म्हणते की, “यानंतर नागिनची गरज नाहीये. यावेळी नागराजसोबतच काम करावं असं वाटतंय.” बिग पिक्चरचा हा महाएपिसोड या वीकेंडला टेलिकास्ट केला जाणार आहे. या एपिसोडमध्ये एकताने सांगितले की, रणवीर सिंग हा तिचा क्रश आहे. यानंतर ते दोघे डान्स करतात.

मौनी रॉयने ‘नागिन’ या मालिकेत काम करून सगळ्यांची मने जिंकली आहेत. यानंतर ती खूप नावारूपाला आली. तिला सर्वत्र ‘नागिन’ असेच नाव पडले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे


Latest Post

error: Content is protected !!