दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे देशभरात खूप चाहते आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याचसोबत सोशल मीडियावरही त्याची खूप चर्चा होते. गेल्या काही काळापासून त्याच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासह, अभिनेता त्याच्या लक्झरी कार लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूलमुळे देखील खूप चर्चेत आहे. आता या संदर्भात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. जी प्रत्येकाच्या भुवया उंचावेल. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने या ३.१५ कोटीच्या कारसाठी एक विशेष क्रमांक घेतला आहे, त्यासाठी त्याने लाखो रुपये दिले आहेत.
ज्युनिअर एनटीआरने यासाठी दिले १७ लाख
असे सांगितले जात आहे की, ज्युनिअर एनटीआरने त्याच्या लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल (Lamborghini Urus Graphite Capsule) कारसाठी ९९९९ हा विशेष क्रमांक घेतला आहे. यासाठी त्याने आरटीए ऑफिसला १७ लाख रुपये दिले आहेत. यानंतर, नवीन कारसाठी त्याला दिलेला नंबर TS ०९ FS ९९९९ आहे. बऱ्याच लोकांप्रमाणे हा नंबर एनटीआरचा भाग्यवान क्रमांक मानला जातो. हा स्पेशल नंबर मिळवण्यासाठी बोली लागली होती, ज्युनिअर एनटीआरला तो १७ लाखात मिळाला.
Car lover @tarak9999 buys India's first Lamborghini Urus Graphite Capsule #NTR pic.twitter.com/WjXFyFAFT2
— Rajasekar (@sekartweets) August 18, 2021
आरटीए ऑफिसने बुधवारी (२२ सप्टेंबर) फॅन्सी नंबरसाठी बोली लावून ४५ लाख रुपये कमावले आहेत. त्यापैकी केवळ एनटीआरने १७ लाख रुपये दिले आहेत. असे सांगितले जात आहे की, आरटीए अधिकाऱ्यांनी अभिनेत्याला या कारचा नोंदणी क्रमांक दिला आहे. ज्युनिअर एनटीआरकडे या क्रमांकाची अधिक वाहने आहेत. याआधी त्याच्या बीएमडब्ल्यू ७ सीरिजच्या कारचा नंबर देखील ९९९९ आहे.
चाहते त्याच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटाची पाहत आहेत वाट
राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचे चाहते त्यांच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच याबाबत माहिती समोर आली आहे, ज्याने सर्वच निराश झाले होते. चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन
-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा
-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही