Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी पवन सिंग अन् आम्रपाली दुबेचे सर्वात बोल्ड गाणे व्हायरल, एक-दोन नाही, तर मिळालेत ‘एवढे’ कोटी हिट्स

पवन सिंग अन् आम्रपाली दुबेचे सर्वात बोल्ड गाणे व्हायरल, एक-दोन नाही, तर मिळालेत ‘एवढे’ कोटी हिट्स

ज्याप्रकारे बॉलिवूड कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात, तसेच काहीसे भोजपुरी कलाकारांबाबतही आहे. आपल्या अभिनयाने आणि गायनाच्या जोरावर घराघरात पोहोचलेला पवन सिंग याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तोदेखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माध्यमांचे आणि त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याचे सिनेमे आणि गाणी ही चाहत्यांना त्याच्याकडे आकर्षित करतात. त्याची गाणी प्रदर्शित होऊन कितीही वर्षे झाली असली, तरीही ती चाहत्यांना पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. असेच त्याचे एक जुने गाणे युट्यूबवर तुफान गाजतंय. या रेकॉर्डब्रेक गाण्याने कोट्यवधी व्ह्यूजचा टप्पाही पार केला आहे.

पवन सिंग (Pawan Singh) याच्या भोजपुरी गाण्यात (Bhojpuri Song) तो अभिनेत्री आम्रपाली दुबे (Aamrapali Dubey) हिच्यासोबत डान्स आणि रोमान्स करताना दिसत आहे. पवनच्या या गाण्याचे नाव ‘राते दिया बुता के’ (Raate Diya Butake) असे आहे. हे गाणे युट्यूबवर जबरदस्त व्ह्यूज मिळवत आहे. चाहत्यांमध्ये या गाण्याची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कदाचित या गाण्याने युट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत.

खरं तर हे गाणे २०१७ मध्ये व्हेव म्युझिकच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला आतापर्यंत ५५ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच या गाण्याला १४ लाख लाईक्सही मिळाले आहेत. तसेच, १ लाखांहून अधिक कमेंट्सचाही पाऊस या व्हिडिओवर पडला आहे.

‘राते दिया बुता के’ या गाण्याच्या व्हिडिओत आम्रपालीचे ठुमके आणि पवन सिंगसोबत तिचा रोमान्स पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ माजवली आहे. हे गाणे गाजण्यामागे स्टार कास्टमधील बोल्ड रोमान्स आणि सेंशुअस स्टेप्स असल्याचे बोलले जात आहे. हे गाणे पवन सिंग आणि इंदु सोनाली यांनी एकत्र मिळून गायले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
आनंदाची बातमी! ‘साथ निभाना साथिया’मधील ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनणार, हटके अंदाजात केली घोषणा
‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉयकॉटवर स्पष्टच बोलला विजय; म्हणाला, ‘फक्त आमिरच नाही, तर हजारो कुटुंब…’
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या २७ दिवसांपूर्वीच राजूने केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडिओ व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा