Wednesday, March 29, 2023

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या २७ दिवसांपूर्वीच राजूने केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडिओ व्हायरल

आपल्या कॉमेडीने चाहत्यांना पोट धरून हसायला भाग पाडणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. राजूला १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका बसला होता. त्यानंतर त्याला दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची तब्येत पाहून डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडे, तो बरा व्हावा यासाठी कुटुंबीय आणि चाहते प्रार्थना करत आहेत. अशात राजूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राजू यमराज आणि मृत्यूचा उल्लेख करताना दिसत आहे.

व्हिडिओत काय म्हणाला राजू श्रीवास्तव?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) त्याच्या गजोधर पात्राच्या अंदाजात बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, “नमस्कार, काही नाही फक्त बसलोय. आयुष्यात असं काम करा की, जर यमराजही तुम्हाला घ्यायला आला, तर तो म्हणला पाहिजे, भाऊ रेड्यावर बसा. तुम्ही पायी चालत आहात, ते चांगले वाटत नाहीये. तुम्ही माणूस असला, तर चांगले व्यक्ती आहात, बसा.” आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

खरं तर राजू श्रीवास्तव हा १० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करत होता, तेव्हाच त्याला हृदयविकाराचा झटका बसला होता. त्यानंतर त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याच दिवशी त्याची एंजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत त्याला शुद्ध आली नाहीये. मध्यंतरी त्याच्या आरोग्यात सुधारणा झाली होती आणि त्याने हात-पाय हलवले होते. मात्र, त्याची तब्येत आता गंभीर झाली असून तो व्हेंटिलेटरवर आहे.

त्याच्या आरोग्यासाठी सर्वजण चिंतेत आहेत. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चन, एहसान कुरेशी, राजपाल यादवसह मनोरंजन जगतातील अनेक कलाकार, हे त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
लाईव्ह सुरू असतानाच आलियाच्या बेबी बंपवर रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, चाहते संतापले
लग्नानंतर दोनवेळा काजोलचं झालंय मिसकॅरेज, मग अजय देवगनने केले होते ‘असे’ काही
‘दिवाळी,ईदला चित्रपट काढून प्रेक्षकांना मुर्ख बनवू नका’, विवेक अग्निहोत्रींचा सलमान, शाहरुखवर थेट निशाणा

हे देखील वाचा