अभिनेता रणवीर सिंग याच्या नवीन फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. रणवीरने एका मासिकासाठी हे फोटोशूट केले असून त्यात तो पूर्णपणे न्यूड (नग्न) आहे. रणवीरने हे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल इंटरनेटवर नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत, पण लोकांच्या या प्रतिक्रियेने मिमी चक्रवर्ती आश्चर्यचकित झाली आहे.
अभिनेत्री आणि राजकारणी मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) हिने रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या फोटोशूटबद्दल ट्वीट करत विचारले की, “हेच फोटोशूट एखाद्या महिलेने केले, तर लोकांची अशीच प्रतिक्रिया असेल का?”
मिमीने विचारला मोठा प्रश्न
मिमीने ट्वीटमध्ये (Mimi Tweet) लिहिले आहे की, “रणवीर सिंगच्या ताज्या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. बहुतेक प्रतिक्रिया फायर इमोजी आहेत. जर ती स्त्री असती, तर कौतुक सारखेच झाले असते का?, किंवा तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तुम्ही तिचे घर जाळून टाकले असते आणि मोर्चे काढले असते, किंवा तिला तिच्या चारित्र्यावरून वाईट साईट बोलले गेले असते.”
लोकांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मिमी म्हणाली की, यातूनच सर्व काही फरक पडतो. तिच्या पुढच्या ट्वीटमध्ये तिने लिहिले, “आम्ही समानतेबद्दल बोलतो, आता कुठे आहे ती? तुम्हाला माहिती आहे की, तुमची विचारसरणी सर्व काही बदलू शकत नाही, पण नष्ट होऊ शकते किंवा नष्ट करू शकते. अशावेळी तुमची विचारसरणी थोडी वाढवा कारण, असे शरीर खूप त्याग करून बनते, माझ्यावर विश्वास ठेवा. (मीठ, साखर, कार्बोहायड्रेट हे सर्व सोडून द्यावे लागेल…)
Internet broke with Ranveer singh’s latest photoshoot and comments were ????????????(mostly).Just wondering if the appreciation would hav been same if she was a woman.Or would u have burned her house down,taken up morchas given her a death threat and slut shamed her.(1/1)
— Mimi chakraborty (@mimichakraborty) July 21, 2022
रणवीर काय म्हणाला?
पेपर मॅगझिनसाठी हे फोटोशूट करणार्या रणवीरने आपल्या निवडीबद्दल सांगितले की, त्याच्यासाठी तो हजारो लोकांसमोर नग्न होऊ शकतो आणि त्याला हरकत नाही. तो म्हणाला, “शारीरिकदृष्ट्या नग्न राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु माझ्या काही परफॉर्मन्समध्ये मी खूप नग्न झालो आहे. तुम्ही माझा आत्मा बघू शकता, किती नग्न होतो हा? खरे तर नग्न राहणे हेच आहे. मी हजारो लोकांसमोर नग्न राहू शकतो, मला पर्वा नाही. फक्त लोकांना समस्या होते.”
View this post on Instagram
रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो आता या वर्षाच्या अखेरीस रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता कोणाचं घर जाळणार?’, म्हणत ढसाढसा रडली प्रसिद्ध अभिनेत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल
दु:खद! क्रिकेट खेळताना प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, पत्नी अन् मुलाला सोडून गेला देवाघरी