Thursday, April 25, 2024

दु:खद! क्रिकेट खेळताना प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, पत्नी अन् मुलाला सोडून गेला देवाघरी

कलाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे टेलिव्हिजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. टीव्ही अभिनेता दीपेश भान याने या जगाचा निरोप घेतला आहे. दीपेश ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत काम करत होता. त्याने या मालिकेत ‘मलखान सिंग’ हे पात्र साकारले होते. तो दीर्घकाळापासून या मालिकेचा भाग होता. त्याच्या निधनाची माहिती सहाय्यक दिग्दर्शक अभिनीत यांनी दिली आहे. दीपेश त्याच्या मागे पत्नी आणि एक मुलाला सोडून गेला आहे. त्याने २०१९ मध्ये दिल्ली येथे लग्न केले होते.

हाती आलेल्या माहितीनुसार, दीपेश भान (Deepesh Bhan) हा शुक्रवारी (दि. २२ जुलै) क्रिकेट खेळत होता. मात्र, क्रिकेट खेळतानाच तो अचानक जमिनीवर कोसळला होता. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सहाय्यक दिग्दर्सक अभिनीत यांच्यासोबत अभिनेता वैभव माथूर यानेही दीपेश भान याच्या निधनाची (Deepesh Bhan Death) माहिती दिली.

दीपेशच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “तो आता या जगात राहिला नाही. यावर मला काहीही बोलायचे नाही. कारण, आता बोलण्यासाठी काही शिल्लक राहिलेच नाही.” खरं तर दीपेश आणि माथूर हे दोघेही मालिकेमध्ये मित्राच्या भूमिकेत होते. तसेच, दोघांमध्ये खूप जवळीकताही होती.

अनेक शोमध्ये घेतला होता दीपेशने भाग
दीपेश याने टीव्ही जगतात दीर्घकाळ काम केले. ‘भाभीजी घर पर है’ मालिकेपूर्वी तो ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआईआर’ यांसारख्या अनेक कॉमेडी शोमध्ये दिसला होता. याव्यतिरिक्त त्याने अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याच्यासोबतही काम केले होते. तो आमिरसोबत टी२० विश्वचषकाच्या एका जाहिरातीमध्ये झळकला होता. तसेच, त्याने सन २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फालतू उटपटांग चटपटी कहाणी’ सिनेमातही काम केले होते.

दीपेश याच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चाहत्यांसोबतच कलाकारही त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

रणवीरपूर्वी चार पैशांसाठी ‘या’ कलाकारांनी सोडलेली लाज, जगासमोर झालेले उघडे; यादीतील नावे खळबळ माजवणारी

गजबच! १५ मिनिटात लग्न आणि ४ तासात मेहंदी, ‘असा’ घाईघाईत पार पडलेला ‘अनुपमा’चा लग्नसोहळा

नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, १२० सिनेमांना दिलंय संगीत

हे देखील वाचा