‘आता कोणाचं घर जाळणार?’, म्हणत ढसाढसा रडली प्रसिद्ध अभिनेत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल

0
155
Akshara-Singh
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/Akshara Singh

अक्षरा सिंग हे भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. अक्षरा सिंग भोजपुरी जगतात तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. यासोबतच अक्षरा सिंग हिने सोशल मीडियावरही खळबळ माजवली आहे. इंटरनेटवर दररोज अक्षरा सिंगचे गाण्यावर थिरकतानाचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. अक्षराच्या प्रत्येक व्हिडिओमधील चेहऱ्यावरील हसू प्रेक्षकांच्या हृदयाला घायाळ करते. मात्र, यावेळी काही वेगळेच घडले आहे.

यावेळी अक्षरा सिंग (Akshara Singh) या व्हिडिओमध्ये हसत नसून रडताना दिसत आहे. तिला प्रेमात फसवल्यामुळे अक्षरा तुटली आहे. तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती “अब किसका घर जलाओगे,” (आता कोणाचे घर जाळणार?) असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

खरं तर, ‘अब किसका घर जलाओगे’ हे अक्षरा सिंग (Akshara Singh) हिचे नवीन गाणे आहे. हे गाणे तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले आहे. अक्षरा सिंगची सर्व गाणी तिच्या स्वत:च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आली आहेत. आता अक्षराचे हृदय कोणी तोडले आहे हे माहित नाही, पण अक्षराला रडताना पाहून तिच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. या व्हिडिओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. चाहते या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत आणि हे गाणे हिट होत आहे.

अक्षरा सिंगच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. या गाण्याचे बोल ऋषी ग्वाला यांनी लिहिले आहेत. तसेच, या व्हिडिओचे संगीत अविनाश झा घुंगरू यांनी दिले आहे. या व्हिडिओमध्ये अक्षरा सिंगच्या भावना चाहत्यांच्या हृदयाला भिडल्या आहेत. केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, तर अक्षरा सिंगला तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अशा वेदना झाल्या आहेत. अक्षरा सिंगला तुटलेल्या हृदयाची वेदना चांगलीच माहीत आहे. मात्र, अक्षराने प्रत्येक वाईट वेळेचा धैर्याने सामना केला आहे. आणि तिच्या आयुष्यातला आनंद परत आणला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दु:खद! क्रिकेट खेळताना प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, पत्नी अन् मुलाला सोडून गेला देवाघरी

रणवीरपूर्वी चार पैशांसाठी ‘या’ कलाकारांनी सोडलेली लाज, जगासमोर झालेले उघडे; यादीतील नावे खळबळ माजवणारी

गजबच! १५ मिनिटात लग्न आणि ४ तासात मेहंदी, ‘असा’ घाईघाईत पार पडलेला ‘अनुपमा’चा लग्नसोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here