Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘आदिपुरुष’मधील ‘रामा’ने लाल किल्ल्यावर रावणाला लावली आग, चाहत्यांनी केला एकच जल्लोष

‘आदिपुरुष’मधील ‘रामा’ने लाल किल्ल्यावर रावणाला लावली आग, चाहत्यांनी केला एकच जल्लोष

विजयादशमी निमित्य राजधानी दिल्लीत भव्य रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, साऊथ स्टार प्रभासही दिल्लीत पोहोचला आणि त्याने लाल किल्ल्यावर रावणाचे दहन केले. दिल्लीमध्ये दरवर्षी लव कुश रामलीला मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

लाल किल्ल्यावर विजयदशमी निमित्य यावेळी ही मंडपात सुमारे 100 फूट उंच पुतळा बांधण्यात आला होता. ज्याचे प्रभासने हवेत बाण सोडत रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले. या रामलीलाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवरही करण्यात आले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सध्या प्रभास (Prabhas) त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवर हा चित्रपट बनवण्यात आला असून यामध्ये अभिनेता भगवान रामाच्या अवतारात दिसणार आहे. आदिपुरुष हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे जो हिंदी आणि तेलुगुमध्ये बनवला जात आहे. मात्र, हा चित्रपट हिंदी, तेलगू व्यतिरिक्त तमिळ, मल्याळम, कन्नड या इतर भाषांमध्येही प्रदर्शित केला जाईल.

अयोध्येत एका शानदार सोहळ्यात ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला होता. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर काही लोकांना आवडला आणि काही लोकांनी याच्या व्हीएफएक्स प्रश्न केले आहेत. काही लोकांनी नाराजी व्यक्त करत ट्वीटरवर प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, “हा टीझर पाहून ‘मार्व्हल अ‍ॅवेंजर्स’ सिरिज आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सारख्या अनेक चित्रपटासारखे वाटत आहे.” अर्थातच ‘आदिपुष’ चित्रपटाची तुलना हॉलिवूडच्या चित्रपटासोबत केली आहे. या चित्रपटाचा टीझर काही लोकांना प्रभावी करण्यात अपयशी ठरला आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘आदिपुरुष’मध्ये प्रभासशिवाय क्रिती सेनॉन सीता बनली आहे, तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली असून दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हद्दच झाली राव! ‘अनन्या’ पुन्हा पोहोचली ट्राेलर्सच्या पत्त्यावर; चाहते म्हणाले, ‘इतके टाइट कपडे…’
राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एक प्रसिद्ध विनोदवीराचे निधन; भावूक होत सुनील पाल म्हणाले…

हे देखील वाचा