Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड अभिनेते प्रकाश राज अपघातात दुखापतग्रस्त, पुढील उपचारांसाठी जाणार हैद्राबादला

अभिनेते प्रकाश राज अपघातात दुखापतग्रस्त, पुढील उपचारांसाठी जाणार हैद्राबादला

‘आली रे आली आता तुझी बारी आली’ हा संवाद ऐकला की, डोळ्यासमोर येतात ते अभिनेते प्रकाश राज. प्रकाश राज यांनी त्यांच्या अभिनयाने साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये देखील त्यांची ओळख निर्माण केली आहे. याच प्रकाश राज यांचा अपघात झाला असून, या अपघातात त्यांना एक फ्रॅक्चर झाले आहे. पुढील उपचारासाठी ते हैद्राबादला रवाना होत आहे. याबद्दल त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

प्रकाश राज हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांनी त्यांच्या सोशल एमडीयावरून एक ट्वीट केले आहे, त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “एक छोटासा अपघात आहे. लहानसे फ्रॅक्चर. सर्जरीसाठी मी माझे मित्र असणाऱ्या डॉक्टर गुरुवरेड्डी यांच्या सुरक्षित हाती आहे. मी लवकरच बरा होईन, काळजीचे करण्याचे काही कारण नाही. मला तुमच्या विचारात ठेवा” या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवर सर्वच लोकं त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत त्यांना ‘गेट वेल सून’ देखील म्हणत आहे. (actor prakash raj injured in small accident)

प्रकाश राज यांनी तेलगू सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. साऊथसृष्टी गाजवत असताना प्रकाश यांनी ‘वॉन्टेड’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि इथे देखील त्यांच्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरले. बहुतकरून नकारात्मक भूमिका करणारे प्रकाश राज सर्वच भूमिका अतिशय ताकदीने पडद्यावर उभ्या करतात.

प्रकाश राज यांनी आतापर्यंत ‘वॉण्टेड’, ‘सिंघम’,’घिल्ली’, ‘अन्निया’, ‘पोकिरी’, ‘गोलमाल रिटर्न’,’दबंग’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रकाश राज लवकरच केजीएफ 2, पोन्नीयन सेल्वम, पुष्पा चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रकाश राज त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे ते अनेकदा वादात देखील अडकले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अरुणिता कांजिलालसोबतच्या आपल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही एकमेकांच्या खूपच…’

सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

 

हे देखील वाचा