‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

मराठी टेलिव्हिजनवर अनेक मालिका आल्या, पण यातील एक मालिका चांगलीच भाव खाऊन गेली, ती म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ होय. अवघ्या महाराष्ट्राने या मालिकेला डोक्यावर घेतले होते. या मालिकेचे दोन्ही पर्व तुफान चालले आहेत. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या मालिकेच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. कोकणातील थरारक रंजक कहाणी या मालिकेत पाहायला मिळाली आहे. या मालिकेतील अण्णा आणि शेवंताच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दर्शवला होता. या मालिकेत शेवंताच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर होती. तसेच अण्णांच्या भूमिकेत माधव अभ्यंकर हे होते. प्रेक्षकांनी या मालिकेच्या पुढच्या भागाची खूप वाट पाहिली आहे. पण आता प्रेक्षकांच्या या प्रतिक्षेला पूर्णविराम लागणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले ३’चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये फक्त शेवंता दिसत आहे. ती साजशृंगार करताना दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच ती या प्रोमोमध्ये “मी लवकरच येणार आहे,” असे सांगत आहे. (apurva nemlekar share ratris khel chale 3 promo on social media)

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबेल.” त्यांचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. सगळेजण तिच्या या पोस्टला कमेंट करून त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. तसेच कलाकार देखील शुभेच्छा देत आहेत. अभिनेता सुयश टिळक याने या व्हिडिओवर कमेंट करून “अभिनंदन,” असे लिहिले आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘रात्रीस खेळ चाले ३’ची शूटिंग चालू होती, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या मालिकेच्या शूटिंगवर निर्बंध लावले गेले होते. त्यामुळे मालिकेची शूटिंग बंद केली होती. कोकणात अण्णा नाईक यांच्या वाड्याभोवती या मालिकेची कहाणी आहे. त्यामुळे इतर ठिकाणी शूटिंग करणे शक्य नव्हते. आता ही मालिका १६ ऑगस्टपासून रात्री ११ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमो पाहून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

-‘शरारा शरारा’ गाण्यावर डान्स करत शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’वर एन्ट्री

Latest Post