Wednesday, July 3, 2024

‘…मी स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकलो’, प्रथमेश परबने दिल्या ‘टाईमपास’ सिनेमाच्या आठवणींना उजाळा

आपल्या आयुष्यातील काही दिवस नेहमीच आपल्यासाठी खास असतात. ते दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. त्या खास दिवसाची आठवण कायम आपल्या मनात असते. कलाकारांच्या दृष्टीने त्यांचा पहिला सिनेमा ज्या दिवशी प्रदर्शित होतो त्या दिवसाची आठवण नेहमीच त्यांना असते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक कलाकार त्यांचा पहिला सिनेमा प्रदर्शित झालेल्या तारखेला एक खास पोस्ट शेअर करतात आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. अशीच एक पोस्ट मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेता प्रथमेश परबने केली.

प्रथमेशने खूप कमी काळात स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये स्थावर केले. त्याने सर्वच प्रकारच्या भूमिका साकारल्या असल्या तरी त्याच्या प्रत्येक भूमिकेला कॉमेडी तसा असतो. कॉमेडी हीच त्याची ओळख आहे. बालक पालक सिनेमात सहायक भूमिकेत दिसलेल्या प्रथमेशला ‘टाईमपास’ या सिनेमाने तुफान ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ‘दगडू’ ही भूमिका साकारत प्रथमेश घराघरात पोहचला आणि त्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. देखणा नसूनही केवळ अभिनय कौशल्यावर त्याने एक अभिनेता अशी ओळख मिळवली. प्रथमेशला सर्वकाही मिळवून देणाऱ्या ‘टाईमपास’ सिनेमा संदर्भात त्याने एक पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेशने त्याचा टाईमपास सिनेमातील एक मस्त फोटो शेअर करत त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “३ जानेवारी या दिवसाने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. याच दिवसाने मला दगडू ही नवीन ओळख मिळवून दिली. ही ओळख आयुष्यभर माझ्यासोबत असेल. ३ जानेवारी या दिवसाने मला मोठा ब्रेक दिला. असा ब्रेक जो प्रत्येक अभिनेत्याला पाहिजे असतो. याच दिवसामुळे मी स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकलो. हा दिवस माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.”

तत्पूर्वी रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या सिनेमात प्रथमेशने दगडू ही भूमिका साकारली होती. या सिनेमातील संवाद, गाणी, संगीत सर्वच तुफ़ा गाजले. ३ जानेवारी २०१४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर टाईमपास २ देखील आला यात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट मुख्य भूमिकेत होते. काही महिन्यांपूर्वी टाईमपास ३ देखील आला त्यात प्रथमेश आणि ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत दिसले.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी संगीतबद्ध केलं होतं पहिलं गाणं; तर बराच रंजक होता आर डी बर्मन यांचा जीवनप्रवास
आर.डी बर्मन स्मृतीदिन : …आणि असे बनले आर.डी बर्मन ‘पंचम दा’, वाचा त्यांच्या नावामागचा किस्सा

हे देखील वाचा