बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याचे योगदान खूपच मोठे आणि प्रशंसनीय आहे. पृथ्वीराज कपूर (prithviraj kapoor) यांच्यापासून सुरु झालेला हा वारसा आज करिना कपूरपर्यंत (kareena kapoor) सतत चालू आहे. पृथ्वीराज कपूर यांनी घातलेल्या पायाला कळस चढवण्याचे काम शो मॅन राज कपूर यांनी केले. एक उत्तम अभिनेता असलेले राज कपूर उत्तम दिग्दर्शक देखील होते. हिंदी सिनेसृष्टीला अतिशय सुंदर सिनेमे त्यांनी दिले आहेत. ही चित्रपटसृष्टी पुढे आणण्यामध्ये राज कपूर (raj kapoor) यांचा सिंहाचा वाटा आहे. सिनेसृष्टीला शिखरावर पोचवणारे आणि त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून सर्वोत्कृष्ट कलाकृती तयार करणारे राज कपूर करिअरच्या सुरुवातील पृथ्वी राज कपूर यांच्या स्टुडिओमध्ये फारच कमी पगारात काम करत हाेते.
नीलकम चित्रपटातून बाॅलिवूड पदार्पन
राज कपूर(Raj Kapoor) यांचे वडिल आणि सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार पृथ्वीराज कपूर(Prithviraj Kapoor) यांना आपल्या मुलाच्या क्षमतेवर विशेष विश्वास नव्हता. यादरम्यान त्यांनी राज कपूर यांना स्टुडिओत केर काढण्याचे काम दिलं. या कामासाठी राज कपूर यांना एक रुपया मासिक पगार मिळत हाेता. मात्र यादरम्यान राज कपूर यांच्या कलेला केदार शर्मा यांनी ओळखले आणि त्यांना आपला चित्रपट ‘नीलकमल’मध्ये हिराेची भूमिका दिली. यानंतर राज कपूर यांनी यशाचे शिखर गाठताना कधीही मागे वळून पाहिले नाही.
राज कपूर यांनी स्वतःच स्टुडिओ केलं ओपन
यानंतर राज कपूर यांनी फार कमी वयात आरके फिल्म्स (RK Films) नावाच स्वत:च स्टुडिओ ओपन केलं. मात्र, त्यांच्या प्राेडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आग (Aag) अयशस्वी ठरला. यानंतर राज कपूर यांच्या बरसात (Barsaat) या चित्रपटाने सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी श्री 420 (Shri 420), आवारा (Awaara), संगम (Sangam) आणि बॉबी (Bobby) यासारखी दमदार चित्रपट बाॅलिवूडला देऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
हेही वाचा-
–डिंपल कपाडिया राज कपूर आणि नर्गिस यांची मुलगी? वाचा काय आहे किस्सा
–दुर्दैवी! राज कपूरांनी ज्या मित्रासाठी 1 रुपयात साईन केला सिनेमा, फ्लॉप झाल्यानंतर त्यानेच सोडले होते जग