Saturday, July 27, 2024

अखेर करणी सेनेच्या विरोधापुढे निर्मात्यांनी मानली हार, ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे बदलण्यात आले नाव

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांचा ‘पृथ्वीराज’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांची चांगली चर्चा होत असतानाच करणी सेनेच्या विरोधामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकल्याचे दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस उरले असतानाच करणी सेनेच्या वाढत्या विरोधामुळे निर्मात्यांवर थेट चित्रपटाचे नाव बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि कोणते आहे  चित्रपटाचे नवीन नाव चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या नावामध्ये बदल करण्याची मागणी करणी सेनेने केली होती. करणी सेनेचे प्रमुख राघवेंद्र मेहरोत्रा यांनी पृथ्वीराजच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटिस पाठवली होती. या नोटीसीमध्ये चित्रपटाच्या नावामुळे रजपूत समुदायाच्या भावना दुखावले असल्याचे म्हणत चित्रपटाच्या नावामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. या नोटीसीवर अनेकवेळा बैठका झाल्यानंतर आता निर्मात्यांनीही हार मानत त्यांची ही मागणी मान्य केली आहे.

यशराज फिल्मसंने याबद्दलचे पत्र करणी सेनेला पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांनी “प्रिय महोदय, आम्ही यशराज फिल्मस १९७० पासून चित्रपट निर्मिती जगतात कार्यरत असून एक यशस्वी चित्रपट निर्माती कंपनी म्हणून कार्यरत आहोत. या काळात आम्ही एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटाची निर्मिती केली आहे. आम्ही चित्रपटाच्या नावात बदल करण्याच्या तुमच्या मागणीचा आदर करतो. आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. चित्रपटातून आम्ही पृथ्वीराज चौहान यांची शौर्यगाथा मांडणार आहोत. त्यामुळेच तुमच्या भावनांचा आदर करत आम्ही चित्रपटाच्या नावामध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ असा बदल करत आहोत,” असे म्हणले आहे. त्यामुळेच आता चित्रपटाच्या नावामध्ये सम्राट पृथ्वीराज असा बदल पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा