Tuesday, April 23, 2024

संपतच्या आत्म’हत्येबाबत मित्राचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘बायकोला घाबरवण्यासाठी…’

कन्नड इंडस्ट्रीतील टीव्ही अभिनेता संपत जे राम यांचे 22 एप्रिल रोजी निधन झाले. माध्यमातील वृत्तानुसार, संपतने वयाच्या 35व्या वर्षी आत्म’हत्या केली आहे. त्यांनी नेलमंगला येथील राहत्या घरी आत्म’हत्या केली होती. अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता असे सांगण्यात येत आहे. अशात आता अभिनेत्याच्या मित्राने खुलासा केला आहे की, ‘संपतने आत्म’हत्या केली नसून तो प्रँक करत होता.’ नेमके काय आहे प्रकरण? जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तानुसार, संपतला बऱ्याच दिवसांपासून काम मिळत नव्हते, त्यामुळे तो त्रस्त झाला होता आणि तणावाचा बळी होऊ लागला होता. या कारणावरून त्यांनी आत्म’हत्येचा मार्ग उचलला. मात्र, या प्रकरणी अद्याप अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून किंवा मित्रांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. अशात आता अभिनेत्याच्या मित्राने त्याचा निर्णय उघड केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajesh Dhruva (@onlyrajeshdhruva)

संपत जे रामचा जवळचा मित्र आणि को-स्टार राजेश ध्रुवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, “संपतचा त्याच्या पत्नीसोबत रात्री किरकोळ वाद झाला होता. या भांडणानंतर तो केवळ पत्नीला घाबरवण्यासाठी गळफास लावून घेण्याचा खोडसाळपणा करत होता, परंतु दुर्दैवाने यादरम्यान त्याला आपला जीव गमवावा लागला. या अपघाताने त्यांच्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीला हादरवून सोडले आहे.”

अभिनेत्याच्या निधनाने त्याचा मित्र राजेश खूप दु:खी झाला आहे. संपतच्या मृत्यूच्या वेळीही अभिनेत्याने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली होती आणि ‘तुमच्यापासून वेगळे होणे हाेण्याची ताकद आमच्यात नाही’, असे म्हटले होते. ‘अजून किती चित्रपट बनायचे आहेत? किती लढाया लढायच्या बाकी आहेत? तुमची स्वप्ने पूर्ण व्हायला अजून वेळ आहे. आम्हाला अजून मोठ्या मंचावर भेटायचे आहे. कृपया परत ये.’ असे त्याने आपल्या नाेटमध्ये लिहिले हाेते. संपत जे राम यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी एनआर पुरा येथे करण्यात आला आहे. (actor rajesh dhruva reveals actor sampath j ram was threatening his wife when he died accidentally)

निक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दगडाची किंमत वाढवत आहे” घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्री पोस्ट झाली व्हायरल

दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

हे देखील वाचा