Tuesday, March 5, 2024

संघर्षाच्या काळात पीसीओमध्ये काम करणारा कपिल शर्मा आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक

कोणाचे नशीब कसे बदलेल याबद्दल कोणीच काहीच सांगू शकत नाही. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्यात ठरवलेले ध्येय गाठू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॉमेडियन कपिल शर्मा. कपिल शर्माने त्याच्या आयुष्यात अतिशय दुःख आणि संकटं झेलली मात्र केवळ आणि केवळ आपल्याला हवे असलेले लक्ष गाठण्याच्या उद्देशाने त्याने प्रवास केला आणि आज त्याचे यश सर्व काही बोलत आहे. आज कपिल शर्मा एक ब्रँड बनला आहे. कॉमेडीच्या जगात एकहाती सत्ता गाजवणारा आणि कॉमेडीयाचं बादशाह म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा आज (2 एप्रिल) रोजी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. कधी काळी एकवेळच्या जेवणासाठी आसुलेल्या कपिलने आता बक्कळ संपत्ती कमावली आहे. आज कपिलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संपत्तीबद्दल.

कपिल शर्मा नेहमीच या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याचा शो ‘द कपिल शर्मा शो’ संपूर्ण जगात अतिशय उत्सुकतेने आणि आनंदाने पाहिला जातो. नुकताच कपिल शर्मा विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला होता. कपिल शर्माचा शो कलाकारांसोबतच प्रेक्षकांची तुफान आवडतो. हसण्याची उत्तम थेरपी म्हणून अनेक लोकं हा शो सतत बघत असतात. कॉमेडीच्या जगात निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 साली अमृतसर इथे झाला.

कपिल शर्माने 2007 साली ‘द ग्रेट इंडियन लॉफ्टर चॅलेंज’ शोपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली. आज कपिल शर्माने या ग्लॅमर जगात त्याचे की वेगळे स्थान आणि नाव निर्माण केले आहे. आज आपण कपिल शर्माच्या संपत्तीची माहिती या लेखातून करून घेऊया. एका माहितीच्या आधारे कपिल शर्मा एका शोसाठी 40 ते 90 लाख रुपये चार्ज करतो. आजच्या घडीला कपिल शर्मा 300 कोटी संपत्तीचा मालक आहे.

कपिल शर्माकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. मर्सडिज बेंज एस क्लास, मर्सडिज बेंज सी क्लास आदी अनेक गाड्या असून, त्याच्याकडे एक कोटी रुपयांची वोल्वो एक्स90 तर 20 लाखांची हाईबुसा बाईकसुद्धा आहे. याशिवाय कपिल शर्माकडे पंजाबमध्ये एक मोठे फार्महाऊस देखील असून त्याची किंमत 25 कोटींपेक्षा अधिक आहे. यासोबतच त्याच्याकडे मुंबईमध्ये तब्बल 15 कोटींचा एका मोठा फ्लॅटदेखील आहे. कपिल शर्माकडे स्वतःची अशी एक व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. या व्हॅनमध्ये सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा असून यासाठी त्याने साडेपाच कोटी खर्च केला आहे.

कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये देखील काही चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याने ‘किस किस को प्यार करू’ सिनेमातून पदार्पण केले त्यानंतर तो ‘फिरंगी’मध्ये देखील दिसला मात्र दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरले. (happy birthday comedian kapil sharma know  his net worth)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिनेमात गुंडांच्या नाकी नऊ आणणाऱ्या अजय देवगणची ‘या’ गोष्टीमुळे टरकते, वाचा कोणती आहे ती गोष्ट
जेव्हा लोक रेमो डिसूझाला ‘कालिया’ म्हणायचे तेव्हा यायचा खूप राग, आईच्या ‘या’ गोष्टीने बदलली विचारसरणी

हे देखील वाचा