Wednesday, July 17, 2024

Fraud अभिनेता राजकुमार रावची झाली मोठी फसवणूक, सोशल मीडियावरुन माहिती देत केली ही विनंती

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. राजकुमार राव सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. यावरुन आपल्या चाहत्यांशी तो अनेक गोष्टी शेअर करत असतो. अलीकडेच राजकुमारने त्याच्या अधिकृत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या पोस्टमध्ये राजकुमार रावने आपल्यासोबत फसवणूक झाल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या पॅनकार्डवर कोणीतरी फसवणूक करून कर्ज घेतले असून, त्यानंतर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्याने केली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याची फसवणूक झाल्याची माहिती दिली आहे. ज्यामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. अभिनेता राजकुमार रावने त्याच्या क्रेडिट स्कोअरचा गैरवापर करून त्याचे पॅन कार्ड फसवणूक करण्यात आले आहे, ज्यामुळे त्याच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम झाला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांनी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) च्या अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.

राजकुमारने आपल्या ट्विटमध्ये “माझ्या पॅन कार्डचा गैरवापर करून, माझ्या नावावर 2500 रुपयांचे छोटे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) कृपया ते दुरुस्त करा आणि याविरुद्ध योग्य ती खबरदारी घ्या.” अशी विनंती संबंधित कंपनीला केली आहे. मात्र सिबिलच्या अधिकृत ट्विटर हँडलने अद्याप त्याच्या या ट्विटला प्रतिसाद दिलेला नाही.

दरम्यान राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो ‘हिट’, ‘मोनिका’, ‘ओ माय डार्लिंग’ आणि ‘भोद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या तरी त्यांची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही, मात्र या वर्षी हे सर्व चित्रपट रिलीज होतील अशी अपेक्षा आहे. राजकुमार राव हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक आव्हानात्मक भूमिका त्याने आपल्या कारकीर्दीत साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा