Tuesday, June 18, 2024

‘या’ कारणामुळे भाग्यश्रीचा पती होता नाराज, अभिनेत्रीने लग्नानंतरच्या दिवसांचा केला खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून भाग्यश्रीचे नाव घेतले जाते. आपल्या कसदार अभिनयाने आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याने तिने बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही भाग्यश्रीच्या चित्रपटांची जोरदार चर्चा होत असते. अशात आज म्हणजे गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) रोजी भाग्यश्रीचा 54 वा वाढदिवस आहे. चला तर मग या निमित्याने जाणून घेऊया भाग्यश्रीची लव्हस्टाेरी…

‘मैने प्यार किया’ या चित्रपटात काम केलेल्या भाग्यश्रीने (Bhagyshree) बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. सध्या ती प्रसिद्ध डान्स रिअलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसत आहे. या शोमध्ये भाग्यश्री तिचा पती हिमालय दासानीसोबत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या कार्यक्रमात दोघांनाही चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. कार्यक्रमात दररोज त्यांच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित गोष्टी समोर येत असतात. आता अभिनेत्री भाग्यश्रीने लग्नाच्यानंतर सासरच्या घरी सुरुवातीचे दिवस कसे होते हे सांगितले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भाग्यश्री सांगते की, सुरुवातीला तिचा पती तिच्यावर खूप रागावला होता. व्हिडिओमध्ये मनीष पॉल भाग्यश्रीला विचारतो की “लग्नानंतर तू घर कसं सांभाळलंस?” तर भाग्यश्री सांगते की ‘ती तिच्या सासरच्या घरी गेली होती. त्यामुळे जेवण यायचे, फक्त भाकरी येत नसे. त्यामुळे त्यांच्या मनात नाराजी होती की तू तुझ्या आईसारखा स्वयंपाक करत नाहीस. पूर्वी अन्न शिजवलेले होते. मग जेवण आटोपताच चहा वर जायचा. तो निघताच पुन्हा जेवायची तयारी चालू होती.

भाग्यश्री म्हणाली की, ‘हे पाहून मला तेव्हा वाटायचे की हे लोक बाप रे किती जेवतात’. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शोमधील त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आहे. समोर आलेल्या बातमीनुसार भाग्यश्री आणि हिमालय दासानी स्मार्ट जोडीच्या सर्वाधिक मानधन घेतलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत. दोघांना एका एपिसोडसाठी 10 लाख रुपये मिळत आहेत. दरम्यान या दोघांची प्रेम कथाही खूपच सुंदर आहे. भाग्यश्री आणि हिमालय दसानी यांची पहिली भेट शाळेत झाली. यानंतर हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. दोघांनीही आपलं नातं लग्नाच्या बंधनात बांधण्याचा निर्णय घेतला. भाग्यश्रीने 1990 मध्ये हिमालय दसानीशी लग्न केले होते. त्यावेळी तिचे आई-वडील या लग्नाला विरोध करत होते. (bhagyshree birthday special and himalay dassani love story )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नाच्या अनेक वर्षांनी भाग्यश्रीने केला खुलासा, ‘या’ कारणामुळे पतीने दिला होता चित्रपटात काम करण्यास नकार
असे काय झाले होते की, मैंने प्यार कियाच्या शूटिंग वेळी भाग्यश्रीने सलमानला दिली होती दूर राहण्याची ताकीद

हे देखील वाचा