Wednesday, April 16, 2025
Home बॉलीवूड राजकुमार रावच्या नव्या नवरीने बिकिनीत थेट मातीत लोळून केली मस्ती, अभिनेताही झाला शर्टलेस

राजकुमार रावच्या नव्या नवरीने बिकिनीत थेट मातीत लोळून केली मस्ती, अभिनेताही झाला शर्टलेस

बॉलिवूडमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. मागील महिन्यापासून कलाकार जोडपे लग्नबंधनात अडकत असल्याचे आपण पाहत आहोत. यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री पत्रलेखा होय. या दोघांनीही मागील महिन्यात १५ नोव्हेंबर रोजी चंदीगड येथे लग्नगाठ बांधली. त्यावेळी संपूर्ण बॉलिवूडमधून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. या जोडप्याच्या फोटोंनी तेव्हापासूनच सोशल मीडियावर धमाल केलीय. मात्र, आता नुकताच त्यांचा असा एक फोटो समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

खरं तर सोशल मीडियावर धमाल घातलेल्या या फोटोंमध्ये नवविवाहित जोडपे राजकुमार (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) हटके लूकमध्ये दिसत आहेत. पत्रलेखाने बिकिनी परिधान केलीय, तर राजकुमारही शर्टलेस झालेला दिसत आहे.

हे देखील वाचा