लग्न तर झाले, पण ग्रँड पार्टी अजून बाकी! ‘या’ दिवशी आलिशान हॉटेलमध्ये होणार ‘विकॅट’चे वेडिंग रिसेप्शन

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल नुकतेच विवाहबंधनात अडकले. राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्से फोर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर ते दोघेही मालदीवला हनीमूनसाठी रवाना झाले. हनीमूनवरून परतल्यावर आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, विकी-कॅटरिनाच्या रिसेप्शनची तारीख आणि जागा ठरली आहे.

कॅटरिनाच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हे रिसेप्शन कोरोना परिस्थितीचा विचार करून केले जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत बीएमसीने ठरवून दिलेल्या नियमांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करून रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. या रिसेप्शन पार्टीसाठी कोणत्या सेलिब्रिटींना आंमंत्रित करण्यात येणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

‘विकॅट’च्या (ViKat) म्हणजेच विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यासह अन्य स्टार देखील हजर राहणार असल्याचे समजते. माध्यमांतील वृत्तांनुसार, या रिसेप्शनसाठीचे इन्व्हिटेशन आधीच देण्यात आले आहे. रिसेप्शनला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना आरटीपीसीआर अहवाल अनिवार्य आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा रिसेप्शन सोहळा २० डिसेंबरला पार पडणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट या हॉटेलमध्ये या जोडप्याच्या रिशेप्शनचा सोहळा पार पडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

कैझाद गुस्ताद यांच्या २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बूम’ या चित्रपटापासून कॅटरिनाने अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर ती ‘सरकार’, ‘मैंने प्यार क्यू किया’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘नमस्ते लंडन’, ‘अपने’, ‘रेस’, ‘पार्टनर’, ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकली. तिच्या शेवटच्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसली होती.

विकी कौशलबाबत बोलायचं झालं, तर विकीने २०१५ साली आलेल्या ‘मसान’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूड पदार्पण केले होते. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने आतापर्यंत ‘रमन राघव’, ‘राजी’, ‘संजू’, ‘उरी’, ‘सरदार उधम’ यांसारख्या जबरदस्त चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा-

Latest Post