भांगेत कुंकू आणि हातात बांगड्या घालून दिसली कॅटरिना कैफ, पती विकीसोबत फोटोग्राफर्सला दिले हटके पोझ


बॉलिवूडची रोमँटिक जोडी म्हणजेच कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे नुकतेच विवाहबंधनात (Katrina Kaif And Vicky Kaushal Marriage) अडकले आहेत. लग्नानंतर हनीमून साजरा करण्यासाठी दोघे मालदीवला रवाना झाले होते. मंगळवारी (१४ डिसेंबर) दोघे मुंबईला परतले. मुंबई विमानतळावरील त्यांचे बरेच फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये नववधू कॅटरिना खूप छान दिसत आहे. विमानतळावर दिसलेल्या कॅटरिना आणि विकीचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा सूट घातल्याचे दिसत आहे. केस मोकळे सोडले आहेत आणि भांगेत कुंकू भरला आहे. यासोबतच तिने लाल रंगाच्या बांगड्या देखील घातला आहे. याव्यितिरिक्त विकीही बिज रंगाच्या शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहे. त्यांनी फोटोग्राफर्सकडे पाहून हात जोडले आहेत. नवविवाहित वधू-वरांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

यावेळी कॅटरिना आणि विकी खूप खुश होते. दोघांनीही फोटोग्राफर्सकडे पाहून पोझ दिल्या आणि ते प्रत्येक फोटोमध्ये हातात हात घालून उभे असल्याचे दिसत होते. ते दोघे एकमेकांसोबत बोलत होते आणि हसताना दिसत होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, विकीला कॅटरीनाशी लग्न करणे सोपे नव्हते. लग्नाच्या इतक्या दिवसानंतर कॅटरिनाच्या एका जवळच्या मैत्रिणीने कॅटरिना लग्नासाठी कोणत्या अटींवर तयार आहे, हे रहस्य समोर आणले.

कॅटरिनाच्या जवळच्या मैत्रिणीने असे सांगितले की, कॅटरिना तिच्या पहिल्या ब्रेकपलामुळे खूप घाबरलेली होती. तिला विकी आवडायचा, पण तिला विचार करण्यास वेळ हवा होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, हे कपल त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहे. या दोघांनी जुहू येथील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला आहे या अपार्टमेंटचे इंटिरियर काम देखील पूर्ण झाले आहे.

या जोडप्याने राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे सात फेरे घेतले. लग्न झाल्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले होते.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल शेअर करताना असे लिहिले होते की, “आमच्या हृदयात केवळ प्रेम आणि कृतज्ञता होती, जी आम्हाला या क्षणापर्यंत घेऊन आली आहे. तुमच्या सर्वांकडून प्रेम आणि आशीर्वाद मिळावा अशी आम्ही मनोकामना करत आहोत. आम्ही आमचे नवीन आयुष्य सुरू करत आहोत.”

 

माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोघांनी रिसेप्शनसाठी मुंबईमधील हॉटेल ताजची निवड केली आहे. रिसेप्शननंतर कॅटरिना आणि विकी आपापल्या कामांमध्ये व्यस्त होणार आहेत. कॅटरिना सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. तसेच विकीकडेही खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!