Wednesday, March 12, 2025
Home साऊथ सिनेमा तुझी- माझी जोडी लाखात एक! सुपरस्टार राम चरणकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पत्नीचा आला ‘असा’ रिप्लाय

तुझी- माझी जोडी लाखात एक! सुपरस्टार राम चरणकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पत्नीचा आला ‘असा’ रिप्लाय

प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस खूपच खास असतो. मग तो आपल्या वडिलांचा असो, आईचा असो, मुलाचा असो, भावाचा असो किंवा पत्नीचा असो. हा दिवस खास करण्यासाठी ते शक्य तो प्रयत्न करतात. असेच काहीसे कलाकारांच्या बाबतीत आहे. मंगळवारी (२० जुलै) दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासनाने आपला ३२ वा वाढदिवस साजरा केला. अर्थातच रामसाठी हा दिवस खूपच खास होता. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

रामने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोला कॅप्शन देत लिहिले की, “उपासना कामिनेनी तू कधीच गरजू व्यक्तींना आणि आपल्या कुटुंबासाठी सर्वोत्तम देणे कधीच बंद केले नाही. कोणतीही भेट तुला धन्यवाद देण्यासाठी पुरेशी असू शकत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

पतीकडून मिळालेल्या या सुंदर शुभेच्छानंतर उपासनानेही फोटोवर कमेंट करत लिहिले की, “ओएमजी! तुम्ही खूपच प्रेमळ आहात. कोणत्याही अटीशिवाय माझे समर्थन करण्यासाठी आणि नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद.”

याव्यतिरिक्त इतर कलाकारांनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. समंथा अक्किनेनीनेही कमेंट करत इमोजी पोस्ट केला आहे. (Actor Ram Charan Birthday Greeting For Wife Upasana Is Adorable)

राम चरणने १४ जून, २०१२ रोजी हैदराबाद येथे उपासना कामिनेनीसोबत लगीनगाठ बांधली होती. मागील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात लग्नाच्या वाढदिवशी उपासनाने सोशल मीडियावर राम चरणसोबतचा मनमोहक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या.

रामच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर त्याने नुकतेच ‘आरआरआर’ या तेलुगू चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरदेखील मुख्य भूमिकेत आहे. एसएस राजामौली यांचा हा चित्रपट ५ भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

राम चरणही लवकरच चित्रपट निर्माते शंकर यांच्यासोबत आपल्या आगामी प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, राम आपल्या आगामी त्रिभाषी चित्रपटाच्या प्रोजेक्टमध्ये दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राम चरणने निर्माते दिल राजू यांच्यासोबतच चित्रपट निर्माते शंकर यांच्याशी चेन्नई येथे त्यांच्या घरी आगामी प्रोजेक्टच्या लाँचिंगपूर्ण भेट घेतली. या चित्रपटाला तात्पुरते ‘आरसी १५’ हे नाव देण्यात आले आहे. हा चित्रपट एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘आरसी १५’ चित्रपटात एसएस थमन यांचे संगीत असेल. तसेच इतर कास्ट आणि क्रू लवकरच निश्चित केले जातील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?

-‘इतके पैसे कसे कमवता?’, कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नावर राज कुंद्राने दिली होती ‘अशी’ रिऍक्शन

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा