‘इतके पैसे कसे कमवता?’, कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नावर राज कुंद्राने दिली होती ‘अशी’ रिऍक्शन


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक केली आहे. उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर राज कुंद्राचे विविध व्हिडिओ, ट्विट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यातच राजचा ‘द कपिल शर्मा शो’मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कपिल शर्मा शोमधील व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा दिसत असून. यात कपिल शर्मा मजेमध्ये राजला विचारतो, “कधी तुम्ही कलाकारांसोबत फुटबॉल खेळताना दिसतात, कधी फ्लाईटमध्ये दिसतात, कधी बातम्यांमध्ये दिसतात, कधी शिल्पाला शॉपिंगला घेऊन जातात, कधी फिरताना दिसतात, पाजी खरं सांगा काहीही न करता तुम्ही इतका पैसा कसा कमवता? इतके व्यस्त असूनही तुम्ही पैसा कसे कमवता.”

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहे. एकाने लिहिले, “आता समजले हा माणूस कुठून पैसा कमवायचा.” दुसऱ्याने लिहिले, “जर शिल्पाला सर्व माहित असूनही हसत असेल, तर याचा अर्थ शिल्पा तिचा योगाचा अभ्यास कुंद्राजी यांच्या चित्रपटांसाठी करत असेल.”

पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने २३ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चर्चा तर होणारच! मौनी रॉयने केला पारदर्शक टॉपमधील मादक लूकचा व्हिडिओ शेअर; पडतोय कमेंट्सचा पाऊस

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.