Tuesday, January 31, 2023

राणा दग्गुबतीने विमानतळावरील अनुभव सांगत केली टिका, इंडिगो एअरलाइनने रिट्वीट करत…

दाक्षिणात्य सुपरस्टारर अभिनेता राणा दग्गुबती आपल्या अभिनयासोबतच सतत आपल्या वक्तव्यामुळे देखिल ओळखला जातो. त्याने नुकतंच विमानातून प्रवास करत असताना त्याला खूप खराब अनुभव आल्याचे सांगितले होते. इंडिगो एअरलाइनने खराब सर्विस दिल्यामुळे त्याने सोशल मीडिवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. मात्र, नुकतंच अभिनेत्याविषयी एक नवीन बातमी समोर येतआहे.

‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा दग्गुबती (Rana Daggubati) याने नुकतंच इंडिगो (IndiGo) मधील आतापर्यतच्या सर्वात खराब एअरलाइनचा अनुभव सांगितला आहे. त्याने ट्वीरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “इंडिगो एअरलाइनचा उडानचा आतापता नही, हरवलेल्या सामानाचा पता देखिल लावू शकत नाही आणि एअरलाइच्या कर्मचाऱ्यांचा देखिल काहीच सुगावा लागला नाही.”

अभिनेताचे ट्वीट पाहून एअरलाइनइंडिगोने त्याच्या ट्वीटचे उत्तर देत अभिनेत्याचे सामान पोहोचले नाही म्हणून माफी मागितली असुविधामुळे क्षमस्वी असल्याचे सांगितले. इंडिगो एअलाइनने रिट्वीट करत लिहिले की, “यादरम्यान झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, कृपया खात्री बाळगा की आमची टीम तुमचे सामान शक्य तितक्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.”

rana daggubati

अभिनेता राणा दुग्गुबती आपल्या कुटुंबियांसोबत बेंगलुरुला जाण्यासाठी निघाला होता, त्याचदरम्यान ही घटना घडली. माध्यमातील वृत्तानुसार हैद्राबदमधील विमानतळावरील विमानामध्ये काही फॉल्ट निघाल्यामुळे सगळ्या प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जाण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे सगळे सामान जिकडेतिकडे झाले होते. मात्र, ही पहिलीच वेळ नही यापूर्वी देखिल अनेक सेलिब्रिटींनी एअरलाइन विरोधात ट्वीट केले होते. त्यांच्यासोबत झालेल्या घटना सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यत पोहोचवल्या होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
हंसिका मोटवानी अडकली विवाह बंधनात, सोशल मीडिवर फोटोंचा कहर
भारतच नाही तर विदेशताही होता ‘या’ कालाकारांचा बोलबाला, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची व्हायची गर्दी

हे देखील वाचा