Tuesday, January 31, 2023

हंसिका मोटवानी अडकली विवाह बंधनात, सोशल मीडिवर फोटोंचा कहर

दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने आपल्या दमदार अभिनेयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपासून अभिनेत्री आपल्या लग्नामुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही तिच्या लग्नाची खूपच उत्सुकता लागली होती. अनेक दिवसांपसून एकमेकांना डेट करत असणारं हे जोडपं शेवटी (दि, 4 डिसेंबर) रोजी विवाह बंधनात अडकलं आहे. दोघेही लग्नामध्ये खूपच खुश दिसत आहेत. नुकतंच विवाह सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिने नुकतंच तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया (Sohail Kathuria)
सोबत लग्नगाठ बांधली आहे. सतत चर्चेत असणाऱ्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हंसिकाने हेवी एंब्रॉयडरी केलेला लाल रंगाचा घागरा घातला आहे. सट मेकअप, लहाण मांग टीका आणि हातामध्ये कलीरे घालून हंसिका खूपच सुंदर दिसत आहे. त्याशिवय पती सोहेल कुथरिया याने पांढऱ्या आणि गोल्डन रंगाची शेरवाणी परिधीन केली आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही हातामध्ये हात घालून चालताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

हंसिकाने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॅनपेजवरुन शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये हंसिकाने लांब घुंघट घेतला असून फुलांच्या चादरमधून एंट्री करताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

अभिनेत्रीचा जयपुरमधील अरावलीतील डोंगरामध्ये मुंडोता फोर्टमध्ये रॉयल अंदाजात लग्न सोहळा पार पडला आहे. त्याच ठिकाणी त्यांचे लग्नापूर्वीचे कार्यक्रमदेखिल पार पडले आहेत. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिवर चांगलीच क्रेज करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
राणा दग्गुबतीने विमानतळावरील अनुभव सांगत केली टिका, इंडिगो एअरलाइनने रिट्वीट करत…
‘बिग बॉस’मध्ये असे काय घडले की, ढसाढसा रडले ‘हे’ स्पर्धक?

हे देखील वाचा