Friday, April 19, 2024

भारतच नाही तर विदेशताही होता ‘या’ कालाकारांचा बोलबाला, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची व्हायची गर्दी

इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनेयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. काही कलाकारांनी भारतातच नाही, तर जगभरातही प्रेक्षकांवर राज्य केले आहे. त्यांची एक झलक पाहायण्यासठी चाहते तरसत असतात. आजही त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. इंडस्ट्रीमधील काही दिवंगत कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या काळामध्ये भारतातच नाही तर विदेशातही आपला जलवा दाखवला आहे. चला तर जाणून घेऊया की, कोणकोण होते ते कालाकार

राज कपूर
बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार राज कपूर (Raj Kapoor) यांनी इंडस्ट्रीमधील अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनेयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. त्यांचे चाहते विदेशातही होते. माध्यमातील वृत्तानुसार रुस सारख्या देशामध्ये जिथे कडक कायदा आणि सरकारच्या प्रोटोकॉल शिवाय एक पानही हालत नाही. अशा देशामध्ये राज कपूर बिगर विजाचे गेले होते. एवढेच काय तर, मॉस्को विमानतळावरुन बाहेर निघत असताना त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहूण प्रत्येक व्यक्ती हैराण झाला होता. अभिनेता कारमध्ये बसल्यानंतर चाहत्यांनी चक्क कारलाच अचलले होते.

श्रीदेवी
बॉलिवूडची हवाहवाई गर्ल म्हणून ओळखली जाणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) हिने आपल्या काळामध्ये तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. इंडस्ट्रीमधील एक स्ट्रॉग अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जायचे. मात्र, मोठ्या ब्रेकनंतर तिने ‘इंग्लिश विंग्लिशन’ चित्रपटातून पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला तेव्हा देखिल प्रेक्षकांनी तिला खूप पसंत केले. भारतच नाही तर हॉन्ग-कॉन्ग आणि जपानसारख्या देशामध्ये अभिनेत्रीचे खूपच चाहते पसरले होते. आजच्या काळातही काही क्लबमध्ये तिचे चित्रपट पाहिले जातात.

राजेश खन्ना
बॉलिवूडमधील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांनी आपल्या वेगळ्याच स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली होती. कोणत्याही पात्रामध्ये ते एकदम घुसायचे आणि त्यांचा अभिनय पडद्यावर लोकांना भुरळ घालत असे. प्रत्येकजन त्यांच्या अभिनयाचे फॅन होत असे. फक्त भारत नाही तर विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहात असतात.

इरफान खान
बॉलिवूडमधील आपल्या अभिनेयाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारा दिवंगत अभिनेता इरफान खान (Irfan Khan) याने भारतातच नाही तर विदेशातही आपल्या अभिनेयाने छाप सोडली आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक पात्रामध्ये आपली धमक दाखवली आहे. असिफा कपाडिया यांचा ‘द वॉरियर’ (2001)मध्ये बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. इरफान याने बाफ्टा अवार्डमध्ये सर्वश्रेष्ठ ब्रिटिश चित्रपटासाठी अलेक्झांडर कोर्डा अवार्डही जिंकला होता. यानंतर त्याने 2018 साली ‘द पजल’ मध्ये मुख्य भूमिका केल्यामुळे त्याचा विदेशातही मोठा चाहतावर्ग झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘बिग बॉस’मध्ये असे काय घडले की, ढसाढसा रडले ‘हे’ स्पर्धक?
आणखी काय हवं! दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगसाठी मोडला ‘हा’ नियम

हे देखील वाचा