सिनेकलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतात. ते कधीकधी असे काही निर्णय घेतात, ज्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे आताही घडले आहे. साऊथ अभिनेता राणा डग्गुबती याने मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्याचे चाहतेही हैराण झाले.
अभिनेता राणा डग्गुबती (Rana Daggubati) हा नेहमीच त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडीत गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर करतो. सोमवारी (दि. ०८ ऑगस्ट) राणाने त्याची पत्नी मिहिका हिच्यासोबत लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचे फोटो शेअर करत त्याने मिहिकाला शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, आता त्याने हे सर्व फोटो डिलीट केले आहेत.
राणाच्या निर्णयाने चाहते चिंतेत
राणाने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतरच इंस्टाग्रामवर शेअर केलेले सर्व पोस्ट काढून टाकल्या. आता त्याचे अकाऊंट पाहिले, तर त्यावर एकही पोस्ट दिसत नाहीये. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले होते की, असं काय झालं ज्यामुळे पत्नीसोबतचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर त्याने सर्व पोस्ट डिलीट केल्या. अशामध्ये अनेकांना असे वाटेल की, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही गडबड झाली असेल, तर असे काहीही नाहीये. त्याच्या पत्नीच्या इंस्टाग्रामवर त्यांचे हे फोटो उपलब्ध आहेत.
View this post on Instagram
या महिन्याच्या सुरुवातीलाच केलेली मोठी घोषणा
राणाने ५ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावरून विश्रांती घेण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला होता. त्याने लिहिले होते की, “काम सुरू आहे. सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे. सिनेमात भेटूया. खूप मोठे, चांगले आणि मजबूत, तुम्हा सर्वांना खूप प्रेम.” त्याने हा निर्णय आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे घेतला असू शकतो आणि तो पुन्हा या प्लॅटफॉर्मवर परतू शकतो.
— Rana Daggubati (@RanaDaggubati) August 5, 2022
राणाचे सिनेमे
राणाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती राणा डग्गुबती हा शेवटचा ‘विराट पर्वम’ या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री साई पल्लवी दिसली होती. मात्र, या सिनेमाला खास कमाल दाखवता आली नव्हती. मात्र, दोन्ही कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी कौतुकाची थाप मिळाली होती. तसेच, राणा डग्गुबती हा पवन कल्याण याच्यासोबत ‘भीमला नायक’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमाने छप्परफाड कमाई केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून अजय देवगणमुळे अभिषेक बच्चनला रस्त्यावरच काढावी लागली होती रात्र, वाचा संपूर्ण किस्सा
‘लाल सिंग चड्डा’चे रामायणाशी आहे खास नाते, आमिर खानने सांगितली सिनेमाची सत्यता
चित्रपटाच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपास्थित करणाऱ्यांना जान्हवीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…