बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर( Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार तयारी सुरू होती. या चर्चांना आता पूर्ण विराम देत दोघांनीही लग्न गाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या शाही विवाह सोहळ्याची त्यांच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. मात्र आलिया भट्टसोबत सात फेरे घेणाऱ्या रणबीरच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री येऊन गेल्या ज्यांच्यासोबत त्याचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले. मात्र ही प्रकरणे काही मांडवापर्यंत येऊ शकली नाहीत. कोणत्या होत्या त्या अभिनेत्री चला जाणून घेऊ.
सोनम कपूर (Sonam Kapoor) – रणबीर कपूर आणि सोनम कपूरने हिंदी चित्रपट जगतात ‘सावरिया’ या चित्रपटातून सोबत पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या वेळी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा समोर आल्या होत्या. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचेही बोलले जात होते मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) – अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूर यांच्याही प्रेमप्रकरणाच्या चर्चा बराच काळ रंगल्या होत्या. दोघांनीही ‘अंजाना अंजानी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याचवेळी त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. मात्र त्यांचे प्रकरण फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) – अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर हे हिंंदी चित्रपट जगतातील गाजलेले प्रेमी युगूल म्हणून चर्चेत आले होते. दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. मात्र त्यांचे हे नाते लग्नापर्यंत जावू शकले नाही त्यामुळे त्यांंचे ब्रेकअप झाले. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केले.
कॅटरिना कैफ (Katrina Kaif) – अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचेही प्रेमप्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते. अजब प्रेम की गजब कहाणी चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा झाली होती. यावेळीच त्यांच्या लवस्टोरीचा माध्यमांना सुगावा लागला होता मात्र त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
नरगिस फकरी (Nargis Fakri) – रॉकस्टार चित्रपटात एकत्र काम केलेल्या नरगिस आणि रणबीरची याच चित्रपटाच्या सेटवरुन लवस्टोरी सुरू झाली होती. यावेळी दोघे एकमेकांना डेटही करत होते मात्र ही लवस्टोरी सुद्धा फार काळ टिकू शकली नाही त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.
श्रुती हसन (Shruti Hasan) – सुपसस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसन आणि रणबीरच्या प्रेमप्रकरणाचीही चांगलीच चर्चा रंगली होती. दोघांची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगवेळी झाली होती. बॉलिवूडमध्ये त्यांच्या लवस्टोरीच्या बातम्या समोर आल्या होत्या .मात्र या दोघांनी कधीही या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिला नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- ‘जर्सी’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये दिसणार शाहिद आणि पंकज कपूर या बापलेकाची जोडी
- जुनियर एनटीआरने पूर्ण केले सिनेसृष्टीमधे २५ वर्ष पूर्ण, आरआरआर सिनेमाने दिली त्याला पॅन इंडिया ओळख
- यशस्वी दिग्दर्शक होण्याआधी सुरज बडजात्या करायचे ‘हे’ काम, अनुपम खेर यांनी केला खुलासा