Thursday, March 28, 2024

कॅटरिना कैफ लवकरच बनणार आई? व्हायरल Video पाहून नेटकरी लावतायेत अंदाज

कलाकार नेहमीच मीडिया आणि त्यांच्या फॅन्सच्या नजरेतून प्रयत्न करूनही सुटत नाही. त्यांच्यावर चहुबाजूनी अनेकांचे लक्ष असते. त्यांच्या छोट्या छोट्या क्रिया, त्यांच्यात होणारे लहान सहान बदल देखील नेहमीच सर्वांच्या लक्षात येतात. अशातच कलाकारांचे लग्न, अभिनेत्रींची प्रेग्नन्सी तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. याबद्दल अनेकदा विविध अफवा देखील उठताना दिसतात. यातून कोणीच वाचू शकत नाही. अशातच आता बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅटरिना कैफबद्दल (Katrina Kaif) एक बातमी जोर धरताना दिसत आहे.

नुकतेच कॅटरिना कैफला एयरपोर्टवर स्पॉट केले गेले. नेहमीच कॅटरिनाचे लूक चर्चेचा विषय असतात. मग पार्टी असो, फंक्शन असो किंवा एयरपोर्ट लूक असो. तिच्या फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा होताना दिसते. कॅटरिनाला नुकतेच एयरपोर्टवर एका गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये पाहिले गेले. यात ती अतिशय सुंदर दिसत होती. डोळ्यांवर गॉगल, मास्क अशा सध्या मात्र तरीही आकर्षक अवतरतात तिने सर्वांचीच मने जिंकली. सध्या कॅटरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

कॅटरिनाचा एयरपोर्ट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओमध्ये तिच्या एकंदरीत अवतारावरून सोशल मीडियावर कॅटरिना कैफ प्रेग्नेंट आहे का? असे प्रश्न नेटकरी विचारताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर एका सेलेब्रिटी फोटोग्राफरच्या अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विचारले की, तिचा लूक पाहून ती प्रेग्नेंट आहे असे वाटत आहे? मात्र अनेकांनी तिच्या या प्रेग्नन्सीवर भाष्य न करता तिच्या या ट्रेडिशनल लूकचे खूपच कौतुक केले आहे. काहींनी व्हिडिओमध्ये कॅटरिनाला एकटीला पाहून विकी कुठे आहे असे देखील विचारले आहे.

तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच कॅटरिनाची एक पोस्ट तुफान व्हायरल झाली होती, ज्यात तिने तिच्या नवऱ्यासाठी विकी कौशलसाठी नाश्ता बनवला होता. कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिने बनवलेल्या नाश्ताचा फोटो शेअर करत ‘नवऱ्यासाठी आज मी रविवारचा नाश्ता बनवला.” कॅटरिना आणि विकी इंडस्ट्रीमधील हॉट कपल म्हणून ओळखले जाते. ९ डिसेंबर २०२१ मध्ये दोघांनी अतिशय गुपचूप आणि खासगी पद्धतीने राजस्थानमध्ये लग्न केले. दोघांमध्ये पाच वर्षाचे अंतर असून, दोघेही सतत मीडियामध्ये गाजताना दिसतात. यासोबतच त्यांचे सुट्ट्यांचे विविध फोटो देखील तुफान व्हायरल होतात. लवकरच कॅटरिना सलमान खानसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसणार असून, विकी सारा अली खानसोबत एका सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा