रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रणबीर सध्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. अशातच एका पुरस्कार सोहळ्यातील रणबीरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेते जीतेंद्र त्यांला गालावर किस करताना दिसतात.
एका पुरस्कार सोहळ्यात रणबीरला महाराष्ट्रीयन ऑफ द ईअरने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर रणबीर आणि जितेंद्र या दोघांची भेट होते. या भेटीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अभिनेते जितेंद्र यांना रणबीर कपूर त्यांच्या कार पर्यंत घेऊन जातो. रणबीरचा हा स्वभाव पाहून ते भावुक होतात. यावेळी जितेंद्र यांनी रणबीरला केवळ मिठ्ठीच नव्हे तर गालावर किस देखील केले. यावेळी, तु खुप मोठी कामगिरी केली आहेस. खुप सुंदर, असच नेहमी करत राहा, जय माता दी. दोघांच हे बॉन्डींग पाहून चाहते लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
जानेवारीमध्ये पार पडलेल्या ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यान, आलिया भट्टने करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.तर ‘ॲनिमल’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट लवकरच नव्या सीरिजद्वारे तुमच्या भेटीला येत आहे. नुकतचं आलिया भटचा आगामी प्रोजेक्ट ‘पोचर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. तर ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर खूप मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरने या चित्रपटासाठी नॉनव्हेज आणि दारू सोडल्याचं समोर आलं होतं. तर रामाच्या भूमिकेसाठी तो स्पेशल ट्रेनिंगही घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या मार्च महिन्यापासून या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
एल्विश यादवच्या अडचणीत वाढ; FSL रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
‘मी गायक नसतो तर आयुष्यात काहीच होऊ शकलो नसतो…’ गुरु रंधावाने केला मोठा खुलासा