Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड हे काय सुरुये! तिकडं आलिया गरोदरपणातही करतेय शूटिंग, इकडं रणबीरचा ब्रालेस अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल

हे काय सुरुये! तिकडं आलिया गरोदरपणातही करतेय शूटिंग, इकडं रणबीरचा ब्रालेस अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल

‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख मिळवलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे रणबीर कपूर होय. रणबीर सध्या चारही बाजूंनी माध्यमांमध्ये झळकतोय. त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नंट आहे. त्यामुळे त्यांचे चाहते या जोडप्याच्या मुलाच्या जन्माची वाट पाहतायत. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच रणबीर आलियाने त्यांच्या येणाऱ्या मुलाची घोषणा केली होती. मात्र, असे असूनही हे जोडपे त्यांच्या कामात व्यस्त आहेत. हातातलं काम आटोपून एकमेकांसोबत प्रेग्नंसीचा आनंद लुटतील. अशातच रणबीरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तो अभिनेत्री वाणी कपूर हिच्यासोबत पोझ देताना दिसत आहे.

रणबीर आणि वाणी यांची धमाल केमिस्ट्री
आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या लंडनमध्ये तिच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या आगामी हॉलिवूड सिनेमाची शूटिंग करत होती. मात्र, दुसरीकडे रणबीर कपूर (Ranbir Kapoo) याचे एक लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत रणबीर अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) हिच्यासोबत सिझलिंग अंदाजात दिसत आहे.

दोघांकडून ‘शमशेरा’चे जोरदार प्रमोशन
खरं तर रणबीर कपूर आणि वाणी कपूर (Ranbir Kapoor And Vaani Kapoor) ही जोडी आगामी ‘शमशेरा’ या सिनेमात झळकणार आहे. अशात या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर आणि वाणी एकमेकांसोबत रोमँटिक फोटोशूट करताना दिसत आहेत. समोर आलेल्या या शूटमध्ये रणबीर एकीकडे शर्टलेस आहे, तर दुसरीकडे वाणीही ब्रालेस लूकमध्ये आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करत खूपच बोल्ड दिसत आहे. रणबीर आणि वाणी यांनी हे फोटोशूट हार्पर बाजारसाठी केले आहे. बाजार इंडिया या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

‘शमशेरा’ कधी घेणार प्रेक्षकांची भेट?
करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘शमशेरा’ हा सिनेमा १८०० सालाच्या अंतावर आधारित आहे. यामध्ये रणबीर डबल रोलमध्ये दिसणार आहे. यामध्ये रणबीर आणि वाणीसोबत संजय दत्त (Sanjay Dutt) हादेखील मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा याच महिन्यात २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पॅरिसमध्ये सुट्यांची मजा लुटतोय ऋतिक रोशन, पोस्ट होतेय व्हायरल

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘काली’च्या निर्मातीवर चिडले ‘हे’ बॉलिवूड चित्रपट निर्माते; म्हणाले, ‘इस्लाम हा…’

हे देखील वाचा