Wednesday, March 27, 2024

‘…मी माफी मागतो’, आलियाला वाढत्या वजनावरून चिडवून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर; आता मागितली माफी

बॉलिवूडमधील नवविवाहित जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र‘ या आगामी सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ते त्यांच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने युट्यूबवरील  एका लाईव्ह सेशनदरम्यान आलियाच्या बेबी बंपच्या वाढत्या वजनावरून तिला चिडवले होते. यामुळे तो जोरदार ट्रोल होतोय. अशात रणबीरने पुढे येत माफी मागितली आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने पत्नी आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्याबद्दल केलेले वक्तव्य नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाहीये. त्यामुळे ते रणबीरला ट्रोल करत चांगलाच धडा शिकवत आहेत. बुधवारी (दि. २४ ऑगस्ट) रणबीर चेन्नईत एसएस राजामौली (SS Rajamouli) आणि नागार्जुन (Nagarjuna) यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) सिनेमाचे प्रमोशन करताना दिसला. शेवटी त्याने माध्यमांशी चर्चा करताना वादावर प्रतिक्रिया दिली.

माध्यमांशी बोलताना रणबीरला विचारण्यात आले की, त्याला आलियावरील कमेंटबद्दल काही बोलायचे आहे का? कारण, चाहते त्याच्यावर नाराज आहेत. त्याने लगेच माफी मागितली आणि हेही मान्य केले की, त्याची विनोदबुद्धी खूपच वाईट आहे. रणबीर म्हणाला की, “होय, बिल्कुल. सर्वप्रथम, मी माझ्या पत्नीवर त्या सर्व गोष्टींसोबत प्रेम करतो, ज्या माझ्या आयुष्यात आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir Kapoor✨ (@ranbirkapoor143_)

रणबीरने मागितली माफी
पुढे बोलताना रणबीर म्हणाला की, “मला वाटते की, तो एक विनोद होतो, जो मजेशीर नव्हता. जर माझ्याकडून कुणाचे मन दुखावले असेल, तर मी माफी मागतो. माझा तसा काहीच विचार नव्हता. त्यामुळे मला त्या लोकांची माफी मागायचीये, जे माझ्यावर नाराज आहेत. मी याबद्दल आलियाशी चर्चा केली आणि ती याबद्दल हसली. तिला याचा काहीही फरक पडला नाही.”

“परंतु माझी विनोदबुद्धी खूपच वाईट आहे. कधी-कधी हे माझ्याच अंगाशी येते. त्यामुळे जर मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी खरंच माफी मागतो,” असेही पुढे रणबीर म्हणाला. आलिया आणि रणबीर हे त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. त्यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात लग्न केले होते.

‘ब्रह्मास्त्र’ कधी होणार प्रदर्शित
त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात त्यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. हा सिनेमा येत्या ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दाऊदची एक्स गर्लफ्रेंड बॉयकॉट ट्रेंडवर बरळली; म्हणाली, ‘या सगळ्याला कारणीभूत बॉलिवूड कलाकारांचा राग’
चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम
ईशा गुप्ताच्या बोल्डनेसचा कहर, फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम

हे देखील वाचा