Saturday, June 29, 2024

इवल्याशा वयातही फोटोसाठी पोझ देताना दिसली आलियाची भाची, चाहते म्हणाले, ‘ही तर डिट्टो रणबीरसारखी दिसते’

कलाविश्वात प्रत्येक वर्षी अनेक लोक आपले नशीब आजमावण्यासाठी येत असतात. यापैकी काहींना यश मिळते, तर काहींच्या वाट्याला अपयश येते. मात्र, कलाविश्वात असे कुटुंब आहे, ज्याच्या खानादातील प्रत्येक पिढीतून एकतरी अभिनेता किंवा अभिनेत्री नक्कीच येते. ते कुटुंब इतर कुठले नाही, तर कपूर कुटुंब आहे. या खानदानातील अनेक कलाकारांनी बॉलिवूड गाजवले आहे. तसेच, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. आता असे वाटते की, रणबीर कपूर यानंतर त्याची भाचीही अभिनेत्री बनण्याच्या तयारीत आहे.

खरं तर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या भाचीचे वय फार जास्त नाहीये. मात्र, ते म्हणतात ना, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.’ असेच काहीसे समारा साहनी (Samara Sahni) हिच्याबद्दल आहे.

समाराचे क्यूट पोझ
सध्या रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा साहनी (Riddhima Sahni) हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती तिच्या मुलीसोबत दिसत आहे. रिद्धिमा नुकतीच तिच्या आईसोबत सलूनमध्ये गेली होती आणि यादरम्यान रिद्धिमाने तिच्या मुलीसोबत कॅमेऱ्यासमोर पोझ दिले. मात्र, आईपेक्षाही जास्त लक्ष समाराने वेधले. समारा कॅमेऱ्यासमोर येताच वेगवेगळे पोझ देऊ लागली. हा व्हिडिओ पाहून नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, “किती गोड मुलगी आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “या छोट्या मुलीला पोझ देताना पाहून चांगले वाटले.” आणखी एकाने लिहिले की, “तिची मुलगी डिट्टो रणबीरसारखी दिसतेय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

समाराचेही आहे सोशल मीडियावर अकाऊंट
रिद्धिमा साहनी हिची मुलगी समारा साहनी हिचेही सोशल मीडियावर अकाऊंट आहे, ज्यावरून ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इतकेच नाही, तर चाहते समाराला रणबीर कपूरची कॉपीही म्हणतात. समाराचे वय हे फक्त ११ आहे. तसेच, एक स्टारकिड असल्यामुळे ती चांगलीच लाईमलाईटमध्ये असते.

मामीवर करते जीवापाड प्रेम
समारा हिने तिच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष तेव्हा वेधले होते, जेव्हा तिने तिच्या कुटुंबात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचे स्वागत केले होते. रिद्धिमाच्या ११ वर्षीय लेकीने मामा रणबीर आणि त्याची पत्नी आलियाचे फोटोही शेअर केले होते. ती पोस्ट शेअर करत तिने लिहिले होते की, “कुटुंबात स्वागत आहे आलिया मामी. माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Samara Sahni ???? (@samarasahnii)

विशेष म्हणजे आलियानेही तिच्या या पोस्टवर कमेंट करत “माझे तुझ्यावर प्रेम आहे समु,” असे लिहिले होते. यावरून समजते की, अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासाठी समाराची ही पोस्ट किती खास होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! बिपाशाने फोटो शेअर करत एकदाचं सांगूनच टाकलं, पाहून तुम्हीही व्हाल खुश
‘या’ आहेत हिट सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी, महेश बाबूच्या पत्नीसोबत होतं अफेअर?
सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या मांजरेकरांनी उराशी बाळगलेलं ‘हे’ स्वप्न, पण अभिनयाने मिळवून दिली ओळख

हे देखील वाचा