Monday, October 2, 2023

‘या’ आहेत हिट सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी, महेश बाबूच्या पत्नीसोबत होतं अफेअर?

आपण लहानपणीच आपल्याला भविष्यात काय करायचं हे मनाशी पक्कं करतो. मात्र, अनेकदा पुढे जाऊन आपण जे ठरवलेलं असतं, ते तर आपण पूर्ण करतोच आणि त्यासोबतच आपल्याला इतर कामातही हात आजमावण्याची संधी मिळते. अशीच संधी महेश मांजरेकर यांनाही मिळाली आणि त्यांनी त्याचे सोनेही केले. मांजरेकरांना दिग्दर्शक बनायचे होते, हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलेच. यासोबतच त्यांना अभिनयातही हात आजमावण्याची संधी मिळाली. त्यांना पहिल्याच सिनेमातील अभिनयाला जोरदार पसंती मिळाली. मांजरेकर बुधवारी (दि. 16 ऑगस्ट) त्यांचा 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्याविषयीच्या खास गोष्टी…

मुंबईत झाला जन्म
महेश वामन मांजरेकर (Mahesh Vaman Manjrekar) यांचा जन्म 16 ऑगस्ट, 1958 रोजी मुंबईत झाला होता. महेश मांजरेकर हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आहेत. त्यांनी मराठी, भोजपुरी, हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्येही काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात दूरदर्शनवरील ‘क्षितिज’ या मराठी मालिकेतून केली होती. यामध्ये त्यांनी कुष्ठरोग्याची भूमिका साकारली होती.

दिग्दर्शक म्हणून पहिला हिंदी सिनेमा
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी ‘आई’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. मात्र, 1999 मध्ये प्रदर्शित झालेला ‘वास्तव: द रियॅलिटी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी सिनेमा होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. यामध्ये संजय दत्त, नम्रता शिरोडकर, संजय नार्वेकर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

नम्रता शिरोडकरसोबत अफेअर?
माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘वास्तव’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान महेश मांजरेकर आणि नम्रता शिरोडकर यांचे अफेअर सुरू होते. त्यांनी त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये नम्रताला अनेक पात्र साकारण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांच्यातील नाते जास्त काळ टिकू शकले नव्हते. पुढे नम्रताने साऊथ सुपरस्टार महेश बाबू याच्यासोबत संसार थाटला आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

‘कांटे’मधून अभिनयाला सुरुवात
मांजरेकरांनी दिग्दर्शनासोबतच अभिनयातही हात आजमावला. त्यांनी सन 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. त्यांच्या भूमिकेला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली होती. त्यांच्या सिनेमांमध्ये ‘प्राण जाए पर शान न जाए’, ‘मुसाफिर’, ‘जिंदा’, ‘मीराबाई नॉट ऑउट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘वांटेड’, ‘तीन पत्ती’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगॉर्ड’, ‘ओह माई गॉड’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘हिम्मतवाला’, ‘शूटआउट एट वडाला’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’, ‘जय हो’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘वृंदावन’, ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘टोटल धमाल’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘भाई- व्यक्ती की वल्ली’, आणि ‘साहो’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त त्यांनी ‘झलक दिखला जा 1’, ‘सीआयडी’ आणि ‘बिग बॉस मराठी’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.

कुख्यात गुंडाचा फोन?
मांजरेकर एका व्यक्तीच्या फोनमुळे चांगलेच चिंतेत होते. त्यांना कुख्यात गुंड अबू सालेमचा फोन आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, हा बनावट फोन होता. मांजरेकरांनी याबाबत पोलीस तक्रारही केली होती. मात्र, या फोननंतर मांजरेकरांची चिंता चांगलीच वाढली होती. तो व्यक्ती स्वत:ला अबू सालेम असल्याचे सांगत होता आणि त्याने मांजरेकरांकडून 35 कोटी रुपयांची मागणीही केली होती.

राजकारणात अपयशी
अभिनेते मांजरेकर 2014च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबईतून मनसेचे उमेदवार होते, पण शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा सिनेमाकडे आपला मार्ग वळवला होता.

मांजरेकरांचे कुटुंब
मांजरेकरांनी कॉस्च्युम डिझायनर दीपा मेहता हिच्याशी संसार थाटला होता. मात्र, नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. त्यानंतर मांजरेकरांनी मेधा मांजरेकर यांच्याशी लग्न केले. त्यांना अश्वमी, सई आणि सत्या मांजरेकर अशी मुलं आहेत. याव्यतिरिक्त मांजरेकरांना आणखी एक मुलगी आहे. तिचे नाव गौरी इंगवले आहे. गौरी ही मांजरेकरांची सावत्र लेक आहे. गौरीने ‘पांघरूण’ या मराठी सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते.

मांजरेकरांची संपत्ती
माध्यमांतील वृत्तांनुसार, महेश मांजरेकर हे 36 कोटींहून अधिक रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. ते एका सिनेमासाठी 5 ते 6 कोटी रुपये घेत असल्याचे रिपोर्ट्स सांगतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, ते टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी जवळपास 30 ते 35 लाख रुपये घेतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

मांजरेकरांची प्रॉडक्शन कंपनी
महेश मांजरेकर यांनी सन 2011मध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्यासोबत ‘ग्रेट मराठी एंटरटेन्मेंट एलएलपी’ ही प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ‘फक्त लढ म्हणा’ हा मराठी सिनेमा तयार झाला होता. हा सिनेमा कोट्यवधी रुपयांमध्ये बनला होता. याव्यतिरिक्त मांजरेकर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा अवॉर्ड फंक्शनमध्ये आमिर, शाहरुख आणि सैफ दिसले होते एकत्र, तेव्हा…
राणी मुखर्जीला 19 वर्षांपूर्वी किस करताना सैफ झाला होता अस्वस्थ; खुद्द अभिनेत्याने केलेला खुलासा

हे देखील वाचा